---Advertisement---

‘भारतीय नारी, सर्वांवर भारी!’, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूचे सेहवागकडून हटके शब्दात कौतुक

On: रविवार, जुलै 25, 2021 10:29 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्याचबरोबर अनेक मुद्द्यांवर ते आपली प्रतिक्रिया देखील देतात. याच दरम्यान सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून वेटलिफ्टर मीराबाई चानूचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल कौतुक केले आहे. २३ जुलैपासून टोकियो ऑलम्पिक स्पर्धा सुरू झाली आहे.

या स्पर्धेमध्ये भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने ४९ किग्रॅ वर्गामधून रौप्यपदक मिळविले आहे. यासह भारतासाठी तिने या ऑलिम्पिकमधील पहिले पदक जिंकले आहे. तिच्या या कामगिरीमुळे भारतातील कानाकोपऱ्यातून तिचे कौतुक केले जात आहे.

सेहवाग यांनी ट्विट करत लिहिले की, ”उत्कृष्ट, भारतीय नारी, सर्वांवर भारी. मीराबाई चानू, नाव लक्षात ठेवा. या कामगिरीसह भारताचा मान वाढविल्याबद्दल धन्यवाद.”

या स्पर्धेमध्ये मिराबाईने एकूण २०२ किलो ग्रॅमसह रौप्य पदक जिंकले आहे, तर चीनच्या हो झिहुईने सुवर्ण पदक जिंकले आहे. तिने स्नॅचमध्ये ९४ आणि क्लीन एँड जर्कीमध्ये ११६ वजन उचलले. कांस्यपदक जिंकणारी इंडोनेशियाची आइसे विंडी कांटिकाने १९४ किलो वजन उचलले.

विशेष म्हणजे जवळजवळ २१ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला वेटलिफ्टींगमध्ये पदक मिळाले आहे. या अगोदर कर्णम मल्लेश्वरीच्या नावे वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक पदक आहे. त्यांनी २००० मध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये ६९ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते.

सध्या भारतीयांना मीराबाईचा अभिमान वाटत आहे. परंतु, मीराबाईचा येथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. मीराबाईच्या अंगातील कलागुणांना तिच्या कुटुंबीयांनी लहानपणापासून ओळखले होते. जेव्हा जंगलातून लाकडे तोडून घरी आणायचे तेव्हा मीराबाईची यात जास्त मदत होत असायची.

मीराबाईला पाहून तिच्या मोठा भाऊ साईखोम सनाटोबा मैइतीला देखील आश्चर्य वाटायचे. महत्वाचे म्हणजे सनातोबाला न उचलता येणारी लाकडाची मोळी मीराबाई उचलायची आणि घरी घेऊन यायची. तेव्हा मीराभाई अवघ्या 12 वर्षांची होती आणि इतक्या लहान वयातच तिच्यातील ताकद पाहून कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

कमनशिबी शॉ! पृथ्वी ठरला पदार्पणात ‘गोल्डन डक’ होणारा दुसरा भारतीय

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ

लईच वाईट! भारतीय हॉकी संघाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाचा ७-१ अशा मोठ्या फरकाने विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---