fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

धोनीच्या टीकाकारांना दिग्गज भारतीय फुटबॉलपटू बायचूंग भुतियाने दिले सडेतोड उत्तर

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी मागील अनेक दिवसांपासून त्याच्या फलंदाजीतील कामगिरीमुळे मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जात आहे. पण भारताचा दिग्गज माजी फुटबॉलपटू बायचूंग भुतियाने धोनीचे समर्थन केले आहे.

भुतिया धोनीबद्दल म्हणाला, ‘मला वाटते तो शानदार आहे. लोक त्याची टीका करत आहेत. कारण ते फक्त बळीचा बकरा शोधत आहेत. पण जर तूम्ही विश्वचषक नीट पाहिला तर मला वाटते त्याने चांगला खेळ केला आहे.’

याबरोबरच भुतियाने म्हटले आहे की चालू क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी जागतिक अपीलची कमतरता आहे. तसेच त्याने या विश्वचषकाला ‘दक्षिण आशिया कप’ असे देखील संबोधले आहे.

या विश्वचषकात सहभागी झालेल्या विश्वचषकात 10 पैकी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे पाच संघ आशिया खंडातील आहेत. पण यांच्यातील फक्त भारताला उपांत्यफेरीत प्रवेश करण्यात यश आले आहे.

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार भुतिया म्हणाला, ‘मला वाटते हा विश्वचषक पूर्णपणे दक्षिण आशिया कप आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये तूम्ही कदाचीत भूतान आणि नेपाळ या आशिया संघांनाही पात्र ठरलेले पाहू शकता.’

तसेच भुतियाने उपहासात्मक प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ‘जर आपण तीन अजून संघ पाठवले तरी ते संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत हा विश्वचषक सहज जिंकेल.’

तो पुढे म्हणाला, ‘विश्वचषकातून ‘विश्व’ हा शब्द हरवल्यासारखा वाटत आहे. युरोपमधून फक्त एक देश खेळत आहे. तसेत आफ्रिकेतूनही एक देश खेळत आहे. पूर्वी झिम्बाब्वे होता.’

‘विंडीजकडे बघून वाटते की ते काही वर्षांनी ते क्रिकेट खेळणे थांबवतील. दक्षिण आफ्रिकेबाबत सांगायचे झाले तर असे वाटत आहे त्यांच्या युवा पिढीने क्रिकेट खेळणे थांबवले आहे. तिथे बास्केटबॉल आणि फुटबॉलला अधिक महत्त्व मिळवित आहेत.’

भुतियाने आयसीसीला खेळाचा प्रसार करण्यासाठी गंभीर प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. तो म्हणाला, ‘विविध देशांमध्ये क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी आयसीसीने गंभीर प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. ही फक्त 10 देशांपूरते मर्यादीत नाही. ते खेळाचा प्रसार करण्यासाठी गंभीर प्रयत्न करताना दिसत नाही.’

‘जर त्यांनी असे केले नाही तर मला वाटते पुढील काही वर्षात भारत, श्रीलंका आणि बांगलादेश हेच संघ असतील आणि नेपाळ, भुतान हे देखील पात्र होतील.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

फॅबिएन ऍलेनने एक हाती जबरदस्त झेल घेत सर्वांनाच केले थक्क, पहा व्हिडिओ

अफगाणिस्तानच्या १८ वर्षीय इक्रम अली खीलने मोडला सचिन तेंडुलकरचा २७ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम

सेमीफायनल आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; हा खेळाडू विश्वचषकातून बाहेर

You might also like