fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारतीय साॅफ्टवेअर इंजिनीअर झाला अमेरिकेच्या क्रिकेट संघाचा कर्णधार

2010 च्या 19 वर्षांखलील विश्वचषकात भारतीय संघाकडून चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेला मुंबईचा सौरभ नेत्रावलकर आता अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे.

27 वर्षीय सौरभने 2010 मध्ये 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून अशोक मनेरियाच्या नेतृत्वाखाली खेळताना 6 सामन्यात 9 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तो त्या विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.

त्यावेळी 19 वर्षांखालील भारतीय संघात केएल राहुल, मयांक अगरवाल, मंदीप सिंग आणि जयंत यादव हे खेळाडू देखील होते.

मुंबईमध्ये जन्म झालेल्या सौरभने नंतर शिक्षणाकडे त्याचे लक्ष केंद्रीत केले. त्याने कॉरनेल विद्यापीठातून कंप्यूटर सायन्समध्ये पदवीचे शिक्षण घेतले.

तसेच तो सध्या अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम देखील करतो. पण तरीही त्याने त्याच्या क्रिकेटची आवड जपताना अनेक स्थानिक क्रिकेट लीगमध्ये खेळणे चालू ठेवले होते.

त्यामुळे त्याने त्याच्या कामगिरीने अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आणि आता तो अमेरिकेच्या संघाचे नेतृत्वाची जबाबदारीही सांभाळणार आहे.

सौरभने याआधी मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटही खेळले आहे. तो 2013 मध्ये कर्नाटकविरुद्ध मुंबईकडून रणजी ट्रॉफीचा सामनाही खेळला आहे.

तो या महिन्यात ओमानमध्ये होणार असलेल्या आयसीसीच्या क्रिकेट लीग डिव्हीजन 3 स्पर्धेत तो अमेरिकेचे नेतृत्व करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

तिशी पुर्ण करताना विराट-सचिनने केलेल्या पराक्रमांचा तुलनात्मक आढावा

मॅच फिक्सिंगमध्ये आडकलेल्या खेळाडूला बेल वाजवण्याचा मान दिल्याने गौतम गंभीर नाराज

Video: एमएस धोनीने विराटला दिलेल्या बर्थडेच्या शुभेच्छा नक्की पहा

You might also like