---Advertisement---

एमएस धोनीच्या ७ वर्षीय लेकीचे गंगा स्नान, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

Ziva-Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी प्रमाणेच त्याची लहान मुलगी झिवा धोनीही नेहमी चर्चेत राहते. चाहत्यामध्ये झिवा खूप लोकप्रिय आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. आता झिवाचा एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.

एमएस धोनी (MS Dhoni) याची ७ वर्षींची मुलगी झिवाचे स्वतःचे अधिकृत इंस्टाग्राम खाते आहे. एमएस धोनी स्वतः नेमही सोशल मीडियापासून लांब राहत आला आहे. त्यामुळे त्याचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी त्याची मुलगी झिवा धोनी (ziva dhoni) आणि त्याची पत्नी साक्षी या दोघींच्या खात्यावरून पाहायला मिळत असतात.

दरम्यान झिवाने अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केलेला नवीन व्हिडिओ खूपच सुंदर आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये श्री कृष्णाची बासरी वाजत आहे. व्हिडिओ गंगा नदीच्या पात्राजवळील आहे. झिवा नदीपात्रातील पाण्यासह खेळत आहे. ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा धोनीच्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चाहत्यांकडून व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळत आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ २ लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.

https://www.instagram.com/reel/CbPQtgvj3ft/?utm_source=ig_web_copy_link

भारतीय संघाचा दिग्गज एमएस धोनीची मुलगी झिवाचा जन्म ६ फेब्रुवारी २०१५ साली झाला होता. भारतीय संघ त्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय विश्वचषक खेळत होता. एमएस धोनी विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. त्यावेळी धोनी म्हटला होता की, देश त्याच्यासाठी सर्वप्रथम आहे आणि बाकीच्या गोष्टी नंतर होऊ शकतात. धोनीला त्याच्या मुलीच्या जन्माची माहिती सुरेश रैनाच्या माध्यमातून मिळाली होती. साक्षीने सुरेश रैनाला फोन केला आणि धोनीला ही बातमी कळवण्यासाठी सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या –

…अन् ‘त्याने’ सबंध क्रिकेटविश्वाला दाखवून दिले की आपण मुरलीधरनपेक्षा कमी नव्हतो

मागच्या हंगामात फेल झालेला ‘हा’ पठ्ठ्या म्हणतोय, ‘मला सनरायझर्सचे पैसे परत करायचेत…’

लसिथ मलिंगा ते भुवनेश्वर कुमार, आयपीएलमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे ७ गोलंदाज, ‘हा’ भारतीय अव्वलस्थानी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---