भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये सामील आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर (1250) आणि विराट कोहली (1050) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी एमएस धोनी याचा क्रमांक लागतो. धोनीची एकूण संपत्ती ही 1040 कोटी रुपये आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर धोनीचे 11 वर्षे जुने ऑफर लेटर व्हायरल होत आहे. यानंतर चाहते एमएस धोनीचा पगार जाणून हैराण झाले आहेत.
धोनीचे ऑफर लेटर व्हायरल
सन 2008मध्ये इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) स्पर्धेच्या पहिल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार बनलेला एमएस धोनी (MS Dhoni) आजपर्यंत याच संघाकडून खेळतोय. सीएसके (CSK) संघ दरवर्षी धोनीला कोट्यवधी रुपयांमध्ये रिटेन करतो. याचदरम्यान इंडिया सिमेंट्स (India Cements) कंपनीने 2012मध्ये त्याला मार्केटिंगच्या उपाध्यक्ष पदाची नोकरी ऑफर केली होती. आता त्याचे ऑफर लेटर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
धोनीच्या चाहत्यांसाठी आश्चर्याची बाब अशी की, या नोकरीसाठी महान खेळाडूचा पगार फक्त 43000 रुपये होता. या लेटरनुसार, धोनीला जुलै 2012मध्ये चेन्नईत इंडिया सिमेंट्सच्या मुख्य कार्यालयात उपाध्यक्ष पदाची नोकरीची ऑफर दिली गेली होती. ऑफर लेटरमध्ये म्हटले गेले आहे की, त्याचा महिन्याचा पगार 43000 रुपये होता, ज्यात 21,970 रुपये महागाई भत्ता आणि 20000 रुपयांचा विशेष पगार होता.
MS Dhoni’s old job offer letter from 2012. where his monthly salary was fixed at Rs 43,000. MS Dhoni was offered the job of Vice President (Marketing) in July 2012 in India Cements head office in Chennai.
Document Source : Lalit Modi. #MSDhoni𓃵 pic.twitter.com/MYEuejCZuq
— Vipin Tiwari (@vipintiwari952) July 25, 2023
या ऑफर लेटरमध्ये असेही लिहिले आहे की, चेन्नईमध्ये राहताना धोनीला 20,400 रुपयांचे घरभाडे मिळेल. जर तो चेन्नईमध्येच राहिला, तर प्रत्येक त्याला प्रत्येक महिन्याला 8400 रुपये मिळतील. तसेच, बाहेर राहिला, तर 8000 रुपयांचा विशेष एचआरए मिळेल. यासोबतच त्याला दर महिन्याला 60000 रुपयांचा विशेष भत्ता आणि शिक्षण/वृत्तपत्राचा 175 रुपये खर्चही मिळेल.
इंडिया सिमेंट्स कुणाची कंपनी?
विशेष म्हणजे, इंडिया सिमेंट्स ही अब्जपती एन श्रीनिवासन यांची कंपनी आहे. श्रीनिवासन हे धोनीच्या नेतृत्वातील आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सचे मालक आहेत. ज्यावर्षी धोनीला 43000 रुपये प्रति महिना नोकरीची ऑफर करण्यात आली होती, त्याच वर्षी सीएसकेने त्याला 8.82 कोटी रुपयांमध्ये रिटने केले होते.
आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं हे लेटर सन 2017मध्ये आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. ललित मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आयसीसी आणि बीसीसीआयने बंदी घातली आहे.
धोनी नवीन क्षेत्रात
भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार एमएस धोनी याने नव्या व्यवसायात प्रवेश केला आहे. धोनीने सिनेमा प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव धोनी एंटरटेनमेंट (Dhoni Entertainment) आहे. या प्रॉडक्शन हाऊसचा ‘लेट्स गेट मॅरिड’ हा पहिला तेलुगू सिनेमा 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे. (former indian captain ms dhoni old job offer letter viral on social media)
महत्त्वाच्या बातम्या-
जगातला सर्वात चपळ फिल्डर झाला 54 वर्षांचा, करिअरमध्ये 8000हून अधिक धावा; निवृत्तीनंतर केली बँकेत नोकरी
IND vs WI : वनडे मालिकेतील पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येईल? सर्व माहिती एकाच क्लिकवर