भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते अनेकदा खेळाडूंवर टीका करताना आणि वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून आले आहेत. नुकतेच ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यंदा वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्हे तर स्वत:चा सर्वकालिन सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा संघ निवडल्यामुळे. परंतु त्यांनी आपल्या संघाचे कर्णधारपद भारतीय खेळाडूला न देता पाकिस्तानी खेळाडूला दिले आहे.
संजय मांजरेकर यांनी आपला सर्वकालीन ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे. यामध्ये त्यांनी फक्त २ भारतीय खेळाडूंना स्थान दिले आहे. त्यांनी आपल्या सर्वकालीन ११ खेळाडूंमध्ये सलामी फलंदाज म्हणून भारतीय दिग्गज फलंदाज सुनील गावसकर आणि श्रीलंकन संघाचा डाव्या हाताचा फलंदाज कुमार संगकाराची निवड केली आहे. तसेच कुमार संगकाराला त्यांनी यष्टीरक्षक म्हणून निवडले आहे. तसेच त्यांनी मध्यक्रमात विस्फोटक फलंदाज विवियन रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांना स्थान दिले आहे.(former indian cricketer sanjay manjrekar all time playing eleven )
यासोबतच सहाव्या क्रमांकावर त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह वॉला स्थान दिले आहे. याबरोबरच अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी आपल्या संघात इमरान खानला स्थान दिले आहे. जे सध्या पाकिस्तानचे प्रधानमंत्री आहेत. संजय मांजरेकरांनी इमरान खान यांना, आपल्या सर्वकालीन संघाचे कर्णधारपद सोपवले आहे.
तसेच गोलंदाजांमध्ये त्यांनी एकमात्र फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला संघात निवडले आहे. यासोबतच जलद गोलंदाज म्हणून वसीम अक्रम, रिचर्ड हेडली आणि मॅक्लम मार्शलला आपल्या जागा दिली आहे. संजय मांजरेकर यांनी आपल्या सर्वकालीन ११ खेळाडूंच्या संघात एकाही दिग्गज भारतीय गोलंदाजाला निवडले नाही.
संजय मांजरेकर यांनी निवडलेला सर्वकालीन ११ खेळाडूंचा संघ-
सुनील गावस्कर, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), विवियनस रिचर्ड्स,सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, सुनील गावस्कर, इमरान खान (कर्णधार), वसीम अक्रम ,रिचर्ड हेडली, मॅक्लम मार्शल, शेन वॉर्न
महत्त्वाच्या बातम्या-
‘एक दिवस असा खेळेन की सगळ्यांची तोंड बंद होतील,’ राणाने सांगितली पंतच्या वाईट दिवसांतील आठवणील
बापरे बाप! भारतीय क्रिकेटपटूंकडे आहेत कोट्यवधींच्या गाड्या; ‘या’ खेळाडूकडे आहे ‘लँबोर्घिनी’
भारतीय चाहत्याने रेनकोट म्हणून वापरला तिरंगा, WTC फायनलमधील घटना





