येत्या जुलै महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार आहे. या संघात आयपीएल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात येऊ शकते. अनेक दिग्गज क्रिकेटपटू या दौऱ्यासाठी आपली प्लेइंग ११ निवडताना दिसून येत आहे. यात आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांची देखील भर पडली आहे.
भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू, इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सराव करण्यात व्यस्त असताना, भारतीय संघाची दुसरी तुकडी श्रीलंकेला रवाना होणार आहे. तिथे त्यांना ५ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यासाठी संजय मांजरेकर यांनी आपल्या प्लेइंग ११ मध्ये आयपीएल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान दिले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एका चर्चासत्रात त्यांना श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी प्लेइंग ११ निवडण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी आपल्या संघात शिखर धवन आणि हार्दिक पंड्यासारख्या अनुभवी खेळाडूंना स्थान दिले आहे. तसेच अनकॅप खेळाडू चेतन सकारिया आणि राहुल तेवतिया यांना देखील संघात स्थान दिले आहे.
तसेच मांजरेकर यांनी, पृथ्वी शॉला देखील धवनचा सलामी जोडीदार म्हणून आपल्या संघात संधी दिली आहे. दोघांनीही आयपीएल २०२१ स्पर्धेत आपल्या संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी त्यांनी मुंबई इंडियन्स संघाचे आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचे नाव सुचवले आहे. या दोघांनीही इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच पुढे त्यांनी आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या मनीष पांडेला आपल्या संघात स्थान दिले आहे.
यासोबतच हार्दिक पंड्या आणि राहुल तेवातिया या दोघांनाही आपल्या संघात स्थान दिले आहे. हे दोघेही आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. तसेच हार्दिक पंड्या फिटनेसच्या कारणामुळे गोलंदाजी देखील करू शकत नाही. तसेच त्यांनी युवा चेतन सकारियाला देखील आपल्या प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले आहे. चेतनने आयपीएलच्या या हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार या संघाचा प्रमुख गोलंदाज असणार आहे. त्याला राहुल चाहर आणि दीपक चाहर या बंधूची साथ मिळेल.
संजय मांजरेकर यांचा टी२० संघ
शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया, चेतन सकारिया, राहुल चाहर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार
महत्त्वाच्या बातम्या-
फिट अँड फाईन… जिममध्ये घाम गाळत ‘जड्डू’ इंग्लंड दौरा गाजवण्यास होतोय सज्ज; बघा सरावाचा व्हिडिओ
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये ‘हा’ असावा रोहितचा सलामी जोडीदार, चाहत्यांच्या मागणीने धरला जोर
भारीच की! श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाला ‘द वॉल’ राहुल द्रविडचं देणार प्रशिक्षण?