आयपीएल २०२१ स्पर्धेत सोमवारी (१९ एप्रिल) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने आमने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ४५ धावांनी विजय मिळवला. दरम्यान एमएस धोनीला ‘कॅप्टनकूल’ का म्हटले जाते? याचे त्याने प्रात्यक्षिक दिले. रविंद्र जडेजाला त्याने जो सल्ला दिला होता, त्यामुळे त्याला गडी बाद करण्यात यश आले होते. यावर आता माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी भाष्य केले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात सीएसकेचा कर्णधार धोनी जोस बटलर बाद होण्यापूर्वी भाकीत करताना दिसत आहे. त्यामध्ये तो जडेजाला चेंडू कोरडा आहे, त्यामुळे तो वळण घेऊ शकतो असे म्हणाला होता. त्याच्या पुढच्या चेंडूवर जडेजाने गोलंदाजी करताना फिरकी चेंडू टाकत जोस बटलरला त्रिफळाचीत करून संघाला मोठे यश मिळवून दिले.
ही घटना १२ व्या षटकातील पहिल्या चेंडूची आहे. त्यावेळी जोस बटलर ५ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४९ धावांवर फलंदाजी करत होता. परंतु त्यानंतर जडेजाने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून बाद केले.
माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी धोनीचे कौतुक करत म्हटले की, “त्याने गोलंदाजीमध्ये केलेला बदल उल्लेखनीय होता. जेव्हा जोस बटलरने षटकार लगावला होता. त्यांनतर दुसरा चेंडू घेण्यात आला होता. त्यावेळी धोनीने जडेजाला म्हटले होते की चेंडू कोरडा आहे आणि तो वळेल. त्यांपुढील चेंडूवर लगेच जडेजाने जोस बटलरला बाद केले. तसेच त्याने मोईन अलीला गोलंदाजीसाठी बोलवले होते. पुन्हा एकदा त्याने अप्रतिम नेतृत्व केल्याचे दिसून आले. ”
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने १८८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यास राजस्थान रॉयल्स संघ अपयशी ठरला. राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर १४३ धावा करण्यात यश आले होते. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाने ४५ धावांनी आपल्या नावावर केला. तसेच हा कर्णधार म्हणून धोनीचा २०० वा सामना होता. या सामन्यात धोनीला विजय मिळवण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती
‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’
‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!