fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एकवेळ सचिन, द्रविडला बाद करणारा क्रिकेटर आज झालाय टॅक्सी ड्रायव्हर

Former Pakistan spinner Arshad Khan now drives a taxi in Sydney

-श्रीकांत जोईल

तसं म्हणाल तर क्रीडा विश्वात फुटबॉल हा असा खेळ आहे जिथे खेळाडू बक्कळ पैसा कमावतात  , पण क्रिकेटर्ससुद्धा त्यांच्या उमेदीच्या काळात भरपूर पैसे कमवत असतात. जो पर्यंत क्रिकेटर्स खेळत असतात तो पर्यंत त्यांच्याकडे पैशाची आवक असते पण असे बरेच खेळाडू असे आहेत ज्यांनी हा खेळ सोडला आणि त्यानंतर त्यांना आपल्या परिवाराला सांभाळण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.

एके काळी भारताच्या दिग्गज फलंदाजांना ‘आउट’ करणारा हा फिरकी गोलंदाज आज टॅक्सी चालवतो आहे. 

भारतीय क्रिकेट संघातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सेहवाग यांचा बळी  मिळवणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण अर्शद खान या एका पाकिस्तानी फिरकी गोलंदाजाने भारताच्या या महान खेळाडूंना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले होते.

पण याच पाकिस्तानी फिरकी गोलंदाजाला आता आपल्या कुटुंबाच्या पोटा-पाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो आहे. तो आज परिवाराचे पोट भरण्यासाठी टॅक्सी चालवत आहे.

अर्शद खानने आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीमध्ये एकूण ७९७ बळी मिळवले आहेत. पण क्रिकेट मधून संन्यास घेतल्यावर त्याची आर्थिक परिस्थीती अशी काय कोलमडली की परिवाराचे पोट  भरण्यासाठी तो आता ऑस्ट्रेलियामध्ये टॅक्सी चालकाचे काम करतो आहे.

वर्ष १९९३ मध्ये अर्शद खानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले खरे पण पाकिस्तानच्या कसोटी संघात पदार्पण करायला वर्ष १९९७ उजाडावे लागले. त्यानंतर अर्शद खान पाकिस्तानच्या संघासाठी २००६ पर्यंत खेळत राहिला. यादरम्यान त्याने ९ कसोटी सामन्यात ३२ बळी आणि ३८ वनडे सामन्यात ५६ बळी मिळवले. या शिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६०१ आणि अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १८९ बळी त्याने मिळवले आहेत.

पण आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये जवळपास ८०० बळी मिळवणाऱ्या या गोलंदाजांवर स्वतःच्या देशात नाही तर ऑस्ट्रेलियामध्ये उबेर टॅक्सी चालवावी लागत आहे. तो सलग वर्ष २००१ ते २००५ पर्यंत पाकिस्तानी संघात यशस्वी गोलंदाज ठरला होता. २००६ मध्ये त्याची संघात निवड झाली पण लवकरच त्याला डावलण्यात आले. त्यानंतर त्याला पुनरागमनाची संधी मिळाली नाही.

त्यादरम्यान तो २०११ पर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत होता. पण त्यानंतर पैशाच्या तंगीचा सामना त्याला करावा लागला, त्यातून बाहेर निघण्यासाठी तो ऑस्ट्रेलियामध्ये निघून गेला आणि तिथे तो परिवारासाठी टॅक्सी चालवून गुजराण करतो आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

रोहित शर्माला पाहून लोकांचा व्हायचा गैरसमज, काय आहे नक्की कारण

डेक्कन चार्जर्सचा एकेवेळचा शिलेदार झालाय डॉक्टर, कोरोना बाधीतांची करतोय सेवा

९१ कसोटी खेळलेल्या क्रिकेटरचं करियर जेव्हा एका खराब खेळीने आलं होतं संपुष्टात

You might also like