भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या संघाला यश मिळवून देण्यात युवा खेळाडूंचा मोलाचा वाटा आहे. या संघात रिषभ पंत, शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांसारखे युवा खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. शुबमन गिलनेही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तो आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रमिज राजा यांनी शुबमन गिलचे तोंडभरून कौतुक केले आहे.
‘द क्विंट’ ला दिलेल्या मुलाखतीत रमिज राजा यांनी म्हटले की, “गिलची क्षमता आयपीएलच्या कामगिरीवरून नाही आखली गेली पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट चांगला आहे. तो मैदानाच्या चारही बाजूला शॉट खेळण्यास सक्षम आहे. त्याला पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. कारण मला अशी शंका आहे की भारतासारख्या देशात, जेव्हा तुमच्याकडे अधिक संसाधने असतील. तर काही युवा खेळाडूंना पुरेशी संधी दिली जात नाही.”
“गिल मला रोहित शर्माच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देतो. मी रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये खेळताना पाहिलं आहे. कधी कधी काही चेंडू आपल्याला भविष्यातील महानतेची कल्पना करून देतात,” असे त्यांनी पुढे म्हटले. (Former Pakistani Cricketer Ramiz raja praised Shubman gill)
रोहित शर्मा सोबत करणार सलामीला फलंदाजी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १८ जून ते २२ जूनदरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्हीही संघांनी मंगळवारी (१५ जून) १५ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये युवा खेळाडू शुबमन गिलला देखील संधी देण्यात आली आहे. तो या सामन्यात रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसून येणार आहे.
गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून केली होती. त्याने आतापर्यंत ७ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ३४.४ च्या सरसरीने ३७८ धावा करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टेस्ट चॅम्पियनशीपचा विजेता एका नव्हे ३ सामन्यांद्वारे ठरवा, शास्त्रींच्या मागणीवर आयसीसीचे आले उत्तर
टीम इंडियाबरोबर शास्त्री ‘डॉगी विंस्टन’चेही बनले गुरू, प्रशिक्षण देतानाचा व्हिडिओ तूफान व्हायरल
WTC Final: कसोटीत ५ शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजाला नारळ, चाहत्यांकडून टिकेचा भडिमार