भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताचे खेळाडू शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हे दोन्ही फलंदाज ज्या प्रकारे बाद झाले त्यावर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) अजिबात खूश नाहीत. ते म्हणाले की हे दोन्ही फलंदाज विकेट फेकून निघून गेले.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल (Shubhman Gill) याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 55 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी खेळली. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने 25 चेंडूत 19 धावा केल्या. मात्र, पूर्णपणे सेट होऊनही या खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही आणि मोठा फटका मारण्याच्या नादात ते बाद झाले.
सुनील गावसकर यांच्या मते या दोन्ही युवा खेळाडूंनी सामन्यात अजिबात संयम दाखवला नाही. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना ते म्हणाले, “श्रेयस अय्यरचा खेळण्यावरचा संयम सुटला, तो 19 धावा करून त्याची विकेट फेकून निघून गेला. शुभमन गिल 52 धावा करून त्यानेही त्याची विकेट फेकून दिली. शतक कसे झळकावायचे हे माहित असले पाहिजे. शुभमन गिलने किमान शतक तरी ठोकायला हवे होते. श्रेयस अय्यरला अशा चांगल्या खेळपट्ट्यांवर चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळत आहे आणि त्यामुळे त्याने त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. मात्र, त्याला मिळालेल्या संधींचा त्याला अजिबात फायदा घेता येत नाही.”
विश्वचषक 2023 मधील 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात पुणे खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशला नमवत भारताने या विश्वचषकातील सलग ४ सामने जिंकले आहेत. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकात 8 विकेट्स गमावून 256 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 41.3 षटकात 3 विकेट्स गमावून विजय मिळवला. भारताकडून विराट कोहली (Virat Kohli) याने नाबाद 103 धावांची खेळी केली. (Former player scathing reaction to Gill-Shreyas Said He has a big)
महत्वाच्या बातम्या –
सूर्याकडून ईशान-हार्दिकचं गुपित उघड? बीसीसीआयने शेअर केलेला व्हिडीओ एकदा पहाच
विश्वचकाच्या 20व्या सामन्यात इंग्लंड-दक्षिण आफ्रिका भिडणार, जाणून घ्या खास आकडेवारी आणि पिच रिपोर्ट