fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

२ वर्ष कर्करोगाशी दिलेली लढाई अयशस्वी, दिग्गज भारतीय खेळाडूचे निधन

Former shooter Pournima Zanane dies of cancer aged 42

मुंबई । भारताची माजी नेमबाज आणि प्रशिक्षक पूर्णिमा जनाने यांचे वयाच्या 42 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. पौर्णिमा या गेल्या दोन वर्षांपासून कर्करोग या भयानक आजाराशी झुंजत होत्या. विदेशात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पौर्णिमा यांनी पुण्यात सोमवारी अखेरचा श्वास घेतला.

पौर्णिमा यांनी विश्वचषक, एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय विक्रम केला होता. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरविले होते. दोन वर्षांपूर्वी केरळमध्ये राष्ट्रीय स्पर्धा सुरू असताना त्यांना कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

पूर्णिमा यांनी भारताकडून खेळताना सॅफ गेम्स (SAF Games), कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप (Commonwealth Championship) आणि एशियन चॅम्पियनशीप (Asian Championship) पदक जिंकले होते. 2012 मध्ये त्या नेमबाज मधून निवृत्त झाल्या होत्या.

निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 2014 साली वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू फ्रँक थॉमसला त्या प्रशिक्षण देत होत्या. आईएसएसएफने त्यांना प्रशिक्षणासाठी ‘ब’ परवाना दिला होता लवकरच तो आता ‘अ’ प्रमाणपत्रमध्ये बदलणार होता.

ट्रेंडिंग घडामोडी – 

क्रिकेट सोडताच रस्त्यावर आला ‘हा’ क्रिकेटपटू; कुटुंब चालविण्यासाठी लावली जीवाची बाजी

‘फादर्स डे’ निमित्त विराट कोहलीने शेअर केला एक भावूक करणारा फोटो

६०० विकेट्स घेणाऱ्या ‘या’ क्रिकेटपटूला एका गुंडाने जेलमधून लिहिले होते अभिनंदनाचे पत्र

You might also like