भारतीय संघातील अनेक खेळाडू सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असतात. ते दररोज फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. तसेच, आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये माजी कर्णधार विराट कोहली याच्या नावाचाही समावेश होतो. विराटचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्याला इंस्टाग्रामवर 235 मिलियनहून अधिक चाहते फॉलो करतात. त्यामुळे त्याच्या प्रत्येक पोस्टला लाखोंच्या घरात लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. अशात विराटने एक पोस्ट शेअर करत त्याचा फोन हरवल्याची माहिती दिली आहे.
विराटचे ट्वीट
विराट कोहली (Virat Kohli) याने फोन हरवल्यानंतर चाहत्यांकडे मदतीचे आवाहन केले आहे. विराटने ट्वीट करत म्हटले की, अनबॉक्सिंगपूर्वीच त्याचा फोन कुठेतरी गमावला आहे. विराटने ट्वीट करत लिहिले की, “यापेक्षा वाईट आणखी काहीच होऊ शकत नाही की, तुम्ही तुमच्या नवीन फोनची अनबॉक्सिंगही केली नाही आणि तो हरवला. कुणी पाहिलाय का?”
https://twitter.com/imVkohli/status/1622823545033342976
मात्र, विराटचा फोन खरंच हरवला आहे का, याबाबत स्पष्टता नाहीये. त्याने कुठल्या तरी मोबाईल ब्रँडचे प्रमोशन करण्यासाठी हे ट्वीट केले असल्याचे बोलले जात आहे. फोन हरवल्याच्या ट्वीटव्यतिरिक्त विराटने इतर कोणतीही माहिती दिली नाहीये. विराटच्या या ट्वीटवर चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “चला यामुळे आता तुझे खेळण्यावर तरी लक्ष लागेल.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “नवीन खरेदी करण्यासाठी पैसे कमी आहेत का?”
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीसाठी तयारी करतोय विराट
विराट कोहली मागील वर्षी यूएईमध्ये खेळण्यात आलेल्या आशिया चषकानंतर फॉर्ममध्ये आला आहे. त्याने 3 वर्षांनंतर फक्त या स्पर्धेतच शतक झळकावले नाही, तर वर्षाच्या शेवटी बांगलादेशविरुद्धही वनडे शतक झळकावत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते. बांगलादेशनंतर विराटने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेतही धमाल कामगिरी केली.
मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणे बाकी आहे. अशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेत लाल चेंडूने शतक झळकावण्याची प्रतीक्षा संपवण्याचा विराटचा प्रयत्न असेल. विराट सध्या नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी तयारी करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. (former skipper virat kohli loosing his phone update on twitter india vs australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलने पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनची माहिती केली लीक! ताबडतोब घ्या जाणून
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत ‘किंग कोहली’च्या निशाण्यावर 3 रेकॉर्ड, सचिनच्या विक्रमालाही बसू शकतो धक्का




