आयसीसीने खेळाडूंची ताजी क्रमावीर जाहीर केली आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत इंग्लंडचा कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रुटने पहिला क्रमांक पटकावला आहे. सध्या सुरू असेलल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेत रुटने जबरदस्त प्रदर्शन केले आणि त्याचा फायदा त्याला क्रमावारीत झाला. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेनला मात्र रुटच्या प्रदर्शनामुळे नुकसान सोसावे लागले आहे.
कर्णधाराच्या रूपात अयशस्वी ठरलेल्या रुटने काही दिवसांपूर्वी इंग्लंडचे कसोटी संघाचे नेतृत्व सोडले. असे असले तरी, फलंदाजाच्या रूपात जो रुट (Joe Root) कधीच कमी पडल्यासारखे वाटले नाही. त्याचे मागच्या वर्षभरातील प्रदर्शन इतर कोणत्याही खेळाडूच्या तुलनेत अप्रतिम राहिले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये रुटने लागोपाठ दोन शतके ठोकली आहेत. याच प्रदर्शनाचे बक्षीस त्याला कसोटी क्रमावारीच्या माध्यमातून मिळाले. ऑस्ट्रेलियन दिग्गज मार्नस लाबुशेन (Marnus Labuchagne) याला मागे टाकत रुटने कसोटी फलंदाजांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.
बुधवारी आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये जो रुट ८९७ गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याचे दिसले. मार्नस लाबुशेन याआधी पहिल्या क्रमांकावर होता, पण ताज्या क्रमावारीत तो ८९२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर दिसला. यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. स्मिथकडे एकूण ८४५ गुण आहेत. चौथ्या क्रमांकार ८१५ गुणांसह पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. तर पाचव्या क्रमाकावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आहे, ज्याच्याकडे ७८९ गुण आहेत.
🔹Joe Root reclaims No.1 spot 🥇
🔹Trent Boult bursts into top 10 🔥Plenty of movement in the @MRFWorldwide ICC Test Player Rankings after the second #ENGvNZ match 👉 https://t.co/J6m5cEKRSA pic.twitter.com/CqV1mlBMmF
— ICC (@ICC) June 15, 2022
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ७५४ गुणांसगे कसोटी फलंदाजांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. तर दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) ७४२ गुणांसह १० व्या क्रमांकावर आहे. जो रुट न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात ११ आणि दुसऱ्या डावात ११५ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात १७६, तर दुसऱ्या डावात ३ धावा करून रुट बाद झाला. यादरम्यान त्याने स्वतःच्या १०,००० कसोटी धावाही पूर्ण केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ज्या दाऊदला पाहून सर्वांची टरकते, त्याला कपिल पाजींनी शिकवलेला चांगलाच धडा, काय होता तो किस्सा?
अरेरे! दुसऱ्या कसोटी विजयासह मालिकाही खिशात घातलेल्या इंग्लंडला आयसीसीकडून दंड, २ गुणही कापले
वयाच्या २३व्या वर्षी अर्धशतकवीर इशान किशनच्या नावे मोठी कामगिरी; रैना, रोहित आणि विराटशी बरोबरी