भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना इंग्लंड संघाने २२७ धावांनी जिंकला होता तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पुनरागमन करत इंग्लंड संघावर ३१७ धावांनी मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे अहमदाबादमध्ये खेळला जाणारा तिसरा सामना हा दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. हा सामना दिवस रात्र कसोटी सामना आहे. तसेच भारतीय संघाच्या खेळाडूंकडून या कसोटी सामन्यात काही विक्रम होताना पाहायला मिळू शकतात.
विराटकडे धोनीला मागे टाकत पुढे जाण्याची संधी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना मालिकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच कर्णधार विराट कोहलीसाठी देखील हा सामना महत्वाचा असणार आहे. हा सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या नावावर कसोटी कर्णधार म्हणून मायदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम होऊ शकतो. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने खेळलेल्या ३० सामन्यात २१ वेळा विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावावर देखील मायदेशात २१ विजय आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून २२ विजयांसह विराट कोहली पहिल्या स्थानी येऊ शकतो.
अश्विनकडे असेल ४०० विकेट घेण्याची संधी
आश्विनने आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये एकूण ३९४ गडी बाद केले आहेत. जर अश्विनला भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ६ गडी बाद करण्यात यश आले तर अश्विनच्या नावे ४०० गडी बाद करण्याचा विक्रम होऊ शकतो. याआधी अनिल कुंबले, कपिल देव आणि हरभजन सिंग यांनी देखील कसोटी क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद केले आहेत.
ईशांत शर्मा खेळणार १०० वा कसोटी सामना
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना भारतीय संघाचा जलद गोलंदाज ईशांत शर्मा साठी १०० वा कसोटी सामना असणार आहे. नुकत्याच ईशांत ने कसोटी क्रिकेटमध्ये ३०० गडी बाद केले आहेत.
जसप्रीत बुमराहला आपल्या होम ग्राउंडवर खेळायची संधी मिळेल
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतीय संघात २०१६ मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने एकूण १३५ सामने खेळले आहेत. यात ६७ एकदिवसीय सामने, ५० टी -२० आंतरराष्ट्रीय सामने आणि १८ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. परंतु त्याला आतापर्यंत मोटेराच्या मैदानावर खेळायची संधी मिळाली नव्हती. पहिल्यांदाच तो या मैदानावर खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आठवतंय का? ११ वर्षांपूर्वी ३६ वर्षांच्या सचिन तेंडूलकरने क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास
इंग्लंडविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना जिंकू शकतो भारतीय संघ, ‘ही’ आहेत ३ कारणे