भारतात क्रिकेटवर सट्टा लावने कायद्याने गुन्हा आहे. पोलीस प्रशासन याबाबत वारंवार सूचनाही देतात. परंतु पोलिसांच्या सूचनेला न जुमानताही वारासणीमध्ये सट्टेबाजी सुरु होती. मात्र वाराणसीच्या लंका आणि लोहता चौकीच्या पोलिसांनी क्राइम ब्रांचसोबत मिळून १५ सट्टेबाजांना अटक केले आहे.
चार विद्यार्थी तर ११ लोकांचा समावेश
मंगळवारी (२७ ऑक्टोबर) रात्री पोलिसांच्या आणि क्राइम ब्रांचच्या टीमने मिळून वाराणसीच्या वेगवेगळ्या भागात छापा मारला. दरम्यान त्यांनी सट्टा लावणाऱ्या १५ लोकांना अटक केली. यात ११ लोकांसह ४ विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांच्याकडून पोलिसांना २,१७,९१० रुपये आणि १२ मोबाईल मिळाले आहेत. मात्र बुधवारी त्या विद्यार्थ्यांच्या जवळच्या व्यक्तिंनी प्रत्येकी २५ हजार रुपयांची जामीन भरल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली.
याविषयी माहिती देत पोलिसांनी सांगितले की, “पोलिस आणि क्राइम ब्रांचची एक टीम वाराणसीच्या नगवा भागात उपस्थित होती. अशात त्यांना सूचना मिळाली की, जवळच्या एका कॉलोनीत आयपीएल सामन्याचा सट्टा लावला जात आहे. त्यामुळे पोलिंसानी वेळ न दवडता घटनास्थळी छापा मारला. पण तिथे गेल्यानंतर त्यांना इतर ठिकाणीही सट्टेबाजी चालू असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी चौघांना सट्टा लावताना रंगेहाथ पकडले.”
“चौकशीतून समोर आले की, हे चौघे विद्यार्थी आहेत. आणि ते ऑनलाइन ऍपच्या माध्यमातून संपर्कातील लोकांसोबत सट्टा लावत आहेत. त्यातून मिळालेल्या पैश्यांतून ते चौघही मस्ती करत होते. तसेच पोलिसांच्या दूसऱ्या टीमला ११ लोक सट्टा लावताना सापडले,” असेही पुढे त्यांनी सांगितले.
सट्टा लावण्याची ही पहिलीच वेळ नाही
यावर्षी आयपीएल सट्टेबाजीची ही पहिली घटना नाही. युएईमध्ये हंगाम सुरू झाल्यापासून देशभरातील अनेक बुकी सक्रिय झाले आहेत. पोलिसांनी कडक कारवाईदेखील केली आहे. ते आरोपींवर शिक्कामोर्तब करत आहेत. पोलीस सर्व प्रयत्न करूनही अद्यापही गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण झालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये सट्टेबाजी : बेंगलोरमधून 3 लोकांना झाली अटक; ‘इतके’ लाख रुपये जप्त
काय सांगता! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी न मिळालेला सुर्यकुमार करणार न्यूझीलंडचे प्रतिनिधित्त्व?
IPL 2020: १६ गुण मिळवूनही प्ले ऑफमध्ये मिळणार नाही संधी?, पाहा काय आहे समीकरण
ट्रेंडिंग लेख-
SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर
Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय