रत्नागिरी अरावली ॲरोज विरुद्ध धुळे चोला वीरांस यांच्या तिसरी लढत झाली. रत्नागिरी तिसऱ्या स्थानी असल्यामुळे रत्नागिरी साठी विजय आवश्यक होतं. तर धुळे संघाचे आव्हान संपुष्टात आले होते. रत्नागिरी संघाने जोरदार सुरुवात करत धुळे संघाला ऑल आऊट केले.
श्रेयस शिंदेच्या आक्रमक खेळीने रत्नागिरी संघाने मध्यांतरला 28-14 अशी आघाडी मिळवली होती. धुळे संघाकडून मितेश कदम पुन्हा एकदा एकाकी झुंज देत होता. रत्नागिरी संघाने धुळे संघाला 4 वेळा ऑल आऊट करत आघाडी मजबूत केली. रत्नागिरी ने हा सामना 63-43 असा जिंकत चौथा विजय मिळवला.
रत्नागिरी संघाकडून श्रेयस शिंदे ने चढाईत 20 गुण मिळवले. वेद पाटील ने ही सुपर टेन पूर्ण करत 18 गुण मिळवले. तर पकडीत भूषण गुढेकर ने 5 तर संजोग लाले ने 4 पकडी केल्या. धुलेच्या मितेश कदमची आणखी एक खेळी व्यर्थ ठरली. मितेश ने 25 गुण मिळवले. (Fourth win for Ratnagiri Aravali Arrows in relegation)
बेस्ट रेडर- मितेश कदम, धुळे चोला वीरांस
बेस्ट डिफेंडर्स- भूषण गुढेकर, रत्नागिरी अरावली ॲरोज
कबड्डी का कमाल- वेद पाटील, रत्नागिरी अरावली ॲरोज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेलीगेशन फेरीत पालघर काझीरंगा रहिनोस, रायगड मराठा मार्वेल्स संघाचा तिसरा विजय
रेलीगेशन फेरीत पालघर काझीरंगा रहिनोस संघाचा चौथा विजय