Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पराभव लागला जिव्हारी! वाढदिवशीच फ्रान्सचा स्ट्रायकर बेन्झेमाची‌ तडकाफडकी निवृत्ती

December 19, 2022
in टॉप बातम्या, फुटबॉल
Photo Courtesy: Twitter/Karim Benzema

Photo Courtesy: Twitter/Karim Benzema


कतार येथे 22 व्या फुटबॉल विश्वचषकाची सांगता झाली. 18 डिसेंबर रोजी लुसेल स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव केला. यासह अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विश्वचषक आपल्या नावे केला. अर्जेंटिना विजेता झाला असला तरी, फ्रान्स संघानेही कडवा प्रतिकार केला. मात्र, त्यांच्या पदरी निराशा पडली. संघाच्या याच पराभवामुळे व्यथित झालेला फ्रान्सचा अनुभवी स्ट्रायकर करीम बेन्झेमा याने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली.

करीम बेन्झेमा हा फ्रान्सच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याला यावर्षीचा फुटबॉल विश्वातील सर्वात उत्तम फुटबॉलपटूला दिला जाणारा बेलॉन डी ऑर पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलेले. त्याचा विश्वचषक संघात समावेश होता. मात्र, स्पर्धा सुरू होण्याच्या केवळ एक दिवस आधी दुखापतीमुळे त्याला बाहेर व्हावे लागले.

J’ai fait les efforts et les erreurs qu’il fallait pour être là où je suis aujourd’hui et j’en suis fier !
J’ai écrit mon histoire et la nôtre prend fin. #Nueve pic.twitter.com/7LYEzbpHEs

— Karim Benzema (@Benzema) December 19, 2022

 

बेन्झेमा सोमवारी (19 डिसेंबर) आपला 35 वा वाढदिवस साजरा करत होता. त्याच्या केवळ एक दिवस आधीच फ्रान्सला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागेल. त्यामुळे नाराज झालेल्या बेन्झेमाने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याने ट्विटरवर पोस्ट करत लिहिले,

‘”मी आज जिथे आहे तिथे जाण्यासाठी मी प्रयत्न आणि चुकाही केल्या आहेत. मला त्याचा अभिमान आहे! मी माझी कथा लिहिली जी आता संपत आहे.’

बेन्झेमा हा केवळ आंतरराष्ट्रीय नव्हे तर क्लब फुटबॉलमध्ये देखील नामवंत फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. ख्रिस्टीयानो रोनाल्डो हा रियाल माद्रिद संघाचा भाग असताना बेन्झेमाला ओळख मिळालेली. त्याने फ्रान्सचे 97 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करताना 37 गोल झळकावले आहेत. 2021 युरो कप फ्रान्स संघाचा तो सदस्य होता.

(France Footballer Karim Benzema Announced Retirement From International Football)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जगजेत्या मेस्सीचा जन्म आसाममधील! काँग्रेस खासदाराच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ
युएईत दिसणार ‘पठाण पॉवर’! नव्या टी20 लीगमध्ये कॅपिटल्ससाठी दाखवणार टशन


Next Post
Photo Courtesy: Twitter

लईच चोपलयं! फक्त 13 वर्षांच्या पोराने पाडला 38 षटकार अन् 30 चौकारांचा पाऊस

Kerala Blasters FC

चेन्नईयन एफसीने कमबॅक केले, केरळा ब्लास्टर्सला बरोबरीत रोखले

Photo Courtesy: Twitter/FIFA World Cup

मैदानाबाहेरही मेस्सीचा बलाढ्य विक्रम! रोनाल्डोलाही करता नाही आली 'अशी' कामगिरी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143