मंगळवारी स्लोव्हेनियाची टेनिसपटू तमारा झिडनसेक फ्रेंच ओपनच्या महिला एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या पॉला बडोसाचा पराभव करून ग्रँड स्लॅमच्या अंतिम चारमध्ये स्थान मिळविणारी तिच्या देशातील पहिली महिला ठरली. या फ्रेंच ओपनपूर्वी झिदानसेकने कोणत्याही ग्रँड स्लॅममध्ये दुसर्या फेरीच्या पुढे प्रगती केली नव्हती. त्याचबरोबर पुरुषांच्या एकेरी गटात ऍलेक्झांडर झ्वेरेव आणि स्टिफानोस त्सित्सिपासने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
प्रथमच ग्रँड स्लॅम उपांत्यपूर्व फेरी गाठणार्या दोन खेळाडूंच्या दरम्यान झालेल्याया सामन्यात जगातील ८५ व्या क्रमांकाच्या झिदानसेकने बडोसाचा ७-५, ४-६, ८-६ ने पराभव केला. झिदानसेकने पहिला सेट जिंकला, पण बडोसाने दुसरा सेट जिंकून बरोबरी केली.
तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये झिडनसेकने ६-५ अशी आघाडी घेतली तेव्हा बडोसाने रागाने तिच्या रॅकेटला मैदानात फेकले होते. पण तिने पुनरागमन केले पण झिडनसेकने तीन ब्रेक पॉईंट वाचवत ७-६ अशी आघाडी घेतली. पुढच्या गेममध्ये तिने चमकदार फोरहँडच्या जोरावर हा सामना जिंकला.
झ्वेरेव, त्सित्सिपास उपांत्य फेरीत
पाचव्या मानांकित स्टिफानोस त्सित्सिपासने द्वितीय मानांकित डॅनिल मेदवेदेवचा ६-६, ७-६ (३), ७-५ असा पराभव करून चौथ्यांदा ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. त्याला या सामन्यात दुसर्या सेटमध्येच संघर्ष करावा लागला, पण अखेर त्याने हा सामना जिंकत अंतिम ४ जणांमध्ये स्थान मिळवले.
दुसरीकडे गेल्या वर्षी यूएस ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या झ्वेरेवने ४६ व्या क्रमांकाच्या अलेझान्ड्रो डेव्हिडोविच फोकिनाचा ६-६, ६-१ ६-१ असा पराभव केला आणि उपांत्यफेरी गाठली. झ्वेरेवने ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही तिसरी वेळ आहे.
आता उपांत्यफेरीत स्टिफानोस त्सित्सिपासला झ्वेरेवचा सामना करावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
महत्त्वाची बातमी! दिग्गज रॉजर फेडररची फ्रेंच ओपनमधून माघार; दिले ‘हे’ कारण