भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. ज्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला होता. आता दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या ताफ्यात चिंतेचे वातावरण असणार आहे. कारण विराट कोहलीला संघात स्थान देण्यासाठी कुठल्या तरी एका खेळाडूला संघाबाहेर व्हावे लागणार आहे.तो खेळाडू कोण असेल ? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी एक मीम शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर हे सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. ते नेहमी मजेशीर ट्विट आणि फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात.नुकताच त्यांनी कु ॲपवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची स्थिती मांडली आहे.
त्यांनी आपल्या कू ॲपवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, हेरा फेरी चित्रपटातील एक मजेशीर सिन शेअर केला आहे. ज्यामध्ये “ओ पाजी मे गिर गया…”हा प्रसिद्ध डायलॉग आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना रंगणार आहे. शेवटच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा बोलबाला होता. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांनी या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
हरभजन सिंगने निवडली कसोटीतील सर्वकालिक ‘प्लेइंग ११’, या खेळाडूला दिली विवियन रिचर्ड्सची उपाधी
पुजारा-रहाणे नव्हे, तर ‘हा’ फलंदाज मुंबई कसोटीतून होऊ शकतो बाहेर; पाहा संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’
आयपीएलमधील ३ दिग्गज ज्यांच्यावर आता बोली लागणं कठीण, कारकीर्द जवळपास संपुष्टात