श्रीलंका येथील ‘लंका प्रीमियर लीग’ या टी20 क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच हंगामाला बुधवारी (26 नोव्हेंबर) सुरुवात झाली. या हंगामातील दुसरा सामना शुक्रवारी(27 नोव्हेंबर) गॉल ग्लेडीएटर्स आणि जाफना स्टॅलियन्स यांच्यात झाला. या सामन्यात गॉल ग्लेडीएटर्सच्या वरिष्ठ खेळाडूने जबरदस्त फलंदाजी करत सर्वांनाच प्रभावित केले.
अवघ्या 93 धावता ग्लेडीएटर्सचा निम्मा संघ झाला बाद
या सामन्यात गॉल ग्लेडीएटर्स कर्णधार शाहिद आफ्रिदीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ग्लेडीएटर्सने डावाची चांगली सुरुवात केली. मात्र हा संघ लय कायम राखण्यात अपयशी ठरला. 13.3 षटकांत अवघ्या 93 धावांवर या संघाने 5 गडी गमावले होते.
शाहिद आफ्रिदीने केली तुफान फटकेबाजी
सहाव्या क्रमांकावर कर्णधार शाहिद आफ्रिदी फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने त्याच्या आक्रमक शैलीत फलंदाजी केली. डावाच्या 18 व्या षटकात आफ्रिदीचे वादळ पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ऑलिव्हियरच्या या षटकात त्याने 4 षटकार लगावले. त्याने सलग तीन चेंडूत तीन षटकार ठोकत अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने पाचव्या चेंडूवरही एक लांबलचक षटकार ठोकला. मात्र शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने 23 चेंडूत 58 धावा केल्या.
या सामन्यात ऑलिव्हियरने शानदार गोलंदाजी करत तीन गडी बाद केले पण 40 वर्षीय शाहिद आफ्रिदीने केलेल्या फटकेबाजीमुळे तो महागडा ठरला.
क्वारंटाईनमध्ये न राहता थेट मैदानात उतरला आफ्रिदी
शाहिद आफ्रिदीने क्वारंटाईनमध्ये न राहताच हा सामना खेळला. वास्तविक आफ्रिदीला जूनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. सामन्याआधी त्याची अँटीबॉडी चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये तंदुरुस्त असल्याचे असल्याचे आढळले. चाचणीनंतरच आफ्रिदीला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने शानदार फलंदाजी करत चाहत्यांची मने जिंकली.
ग्लेडीएटर्सचा झाला पराभव
या सामन्यात ग्लेडीएटर्सने दिलेले 176 धावांचे लक्ष्य स्टॅलियन्सने 8 गडी राखून सहजपणे गाठले.
महत्त्वाच्या बातम्या –
“विराटच्या अनुपस्थितीत ‘या’ फलंदाजाने यावे चौथ्या क्रमांकावर”, माजी क्रिकेटपटूचा सल्ला
टीम इंडियाचे वनडे मालिका विजयाचे स्वप्न भंगणार! या कारणामुळे दुसरा वनडे सामना होणार रद्द?
“पाकिस्तान संघ कोणता क्लब संघ नाही” शोएब अख्तर न्यूझीलंडवर कडाडला
ट्रेंडिंग लेख –
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला
भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके
आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’