श्रीलंका संघाचा माजी कर्णधार कुमार संगकाराने २००२मध्ये चँपियन्स ट्रॉफी दरम्यान घडलेला किस्सा सांगितला आहे. तेव्हा सौरव गांगुली श्रीलंका संघाच्या ड्रेसिंगरुममध्ये आल्याचे संगकारा यावेळी म्हणाला.
त्यावेळी चँपियन्स ट्रॉफीचे दोन सामने पावसामुळे पुर्ण होऊ शकले नव्हते. भारत व श्रीलंका संघाला संयुक्त विजेते घोषीत केले होते.
स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात संगकारा म्हणाला, ” मला आजही तो किस्सा चांगलाच आठवतो. गांगुलीचा रसेल अरनॉल्डबरोबर वाद झाला होता. तेव्हा पंचांनी गांगुलीला शेवटचा समज दिला होता व त्याची तक्रार देखील केली होती.”
“तेव्हा गांगुली आमच्या ड्रेसिंगरुममध्ये आला व आमच्याशी बोलू लागला. जर हे असंच चालू राहिलं तर माझ्यावर बंदी येईल. त्यावेळी आम्ही गांगुलीला म्हटलो की चिंता करण्याचं कारण नाही. आम्ही याला मोठा मुद्दा करणार नाही. यामुळे तुमच्यावर बंदीही येणार नाही,” असे संगकारा पुढे म्हणाला.
या सामन्यात अरनॉल्ड खेळपट्टीवरुन धावत होता. असे त्याने अनेक वेळा केल्याने वाद झाले होते. यामुळे गांगुली व अरनॉल्डमध्येही वाद झाले होते. शेवटी पंचांनी याची दखल घेतली होती.