रविवारी (29 जानेवारी) लखनऊ येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. एकाना क्रिकेट स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळवत संघाने मालिकेत 1-1ने बरोबरी साधली. मात्र, कर्णधार हार्दिक पंड्या याने सामन्यात घेतलेल्या काही निर्णयांमुळे माजी खेळाडू गौतम गंभीर हा चांगलाच संतापला. त्याने यावेळी प्रश्नही उपस्थित केले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील दुसऱ्या टी20 सामन्यात फिरकीपटूंना खेळपट्टीतून चांगली मदत मिळत होती. तसेच, फलंदाजांसाठी ही खेळपट्टी कठीण वाटत होती. अशात संघात युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला उमरान मलिक (Umran Malik) याच्या जागी सामील केले होते. चहलने त्याची निवड योग्य सिद्ध करत 2 षटकात 4 विकेट्स देत 1 विकेट घेतली. या सामन्यात चहलने 4 षटके का टाकली नाहीत, या निर्णयावर गौतम गंभीर (Gautam Gambhir) नाखुश झाला. त्यामुळे गौतम गंभीर हार्दिक पंड्यावर भडकला.
सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना गंभीर म्हणाला की, “हे खूप मोठे आश्चर्य होते, मी याचे उत्तर देऊ शकत नाही आणि तेही अशाप्रकारच्या खेळपट्टीवर. टी20 क्रिकेटमध्ये चहल तुमचा अव्वल क्रमांकाचा फिरकीपटू आहे. त्याच्याकडून फक्त 2 षटके गोलंदाजी करवून घेणे, तेही जेव्हा त्याने फिन ऍलेन याची विकेट घेतली असताना. त्याच्याकडून चार षटके न करवून घेणे, यामध्ये काहीही अर्थ नाही.”
India held their nerve to win with one ball remaining! #INDvNZ 📝 Scorecard: https://t.co/6iWNedCshI pic.twitter.com/ts9sv5vYpZ
— ICC (@ICC) January 29, 2023
कर्णधार हार्दिक पंड्या (Captain Hardik Pandya), कुलदीप यादव आणि दीपक हुड्डा या गोलंदाजांनीच प्रत्येकी 4 षटके गोलंदाजी केली. दुसरीकडे, वॉशिंग्टन सुंदरने 3, चहल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2, तर शिवम मावी याने 1 षटक टाकले. अर्शदीपने 2 षटकात 7 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, मावीशिवाय इतर सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. मावी याला एकही विकेट घेता आली नव्हती.
यावर गंभीर म्हणाला की, “हो, हे खरंय की, तुम्हाला अर्शदीप सिंग आणि शिवम मावी यांसारख्या युवा गोलंदाजांना संधी द्यायची आहे, परंतु तुम्ही चहलकडून शेवटच्या षटकातही गोलंदाजी करवून घेऊ शकत होता. अशाप्रकारच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडला 80-85 धावांवर सर्वबाद करता आले असते. हे हैराण करमारे आहे की, हुड्डाकडून चार षटके टाकून घेतली, पण चहलला चार षटके टाकू दिली नाहीत.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी न्यूझीलंडने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत फक्त 99 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला संघर्ष करावा लागला. भारताने या आव्हानाचा पाठलाग करताना 4 विकेट्सच्या मोबदल्यात 1 चेंडू शिल्लक ठेवत 101 धावा चोपल्या. तसेच, मालिकेत पुनरागमन केले. आता उभय संघातील तिसरा आणि निर्णायक टी20 सामना बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (gautam gambhir angry on skipper hardik pandya know why)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! देशाची मान उंचावणाऱ्या लेकींचा ‘मास्टर ब्लास्टर’च्या हस्ते होणार सन्मान, जय शाहांची घोषणा
‘आता नाही तर कधी?’, सरफराजला डावलले जात असल्यामुळे पाकिस्तानी दिग्गजही नाराज