माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी भारतीय संघाचा हेड कोच गौतम गंभीरशी संबंधित एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. गौतम गंभीरची एकदा एका ट्रक ड्रायव्हरसोबत बाचाबाची झाली होती, असं त्यांनी सांगितलं.
वास्तविक, गौतम गंभीर मैदानावर आक्रमक व्यक्ती म्हणून ओळखला जायचा. त्याची विरोधी संघातील खेळाडूंसोबत अनेकदा बाचाबाची झाली आहे. सध्या समालोचन करत असलेल्या आकाश चोप्रा यांनी गंभीरसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. आकाश चोप्रा यांनी एका पॉडकास्टमध्ये याचा खुलासा केला. आकाश चोप्रा आणि गौतम गंभीर दिल्लीसाठी एकत्र क्रिकेट खेळले आहेत.
आकाश चोप्रा म्हणाले, “गौतम गंभीरचं दिल्लीत एकदा एका ट्रक ड्रायव्हरशी भांडण झालं होतं, कारण त्यानं चुकीचं वळण घेतलं होतं. तो कारमधून खाली उतरला आणि ट्रकवर चढला. त्यानं थेट ड्रायव्हरची कॉलर पकडली आणि शिवीगाळ सुरू केली होती. मी म्हणालो, “गौती, हे काय करतेस?”.
आकाश चोप्रा यांनी गौतम गंभीरचा स्वभाव थोडा तापट असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, ” गंभीर त्याच्या कामात खूप मेहनती होता. त्यानं मैदानावर भरपूर धावा केल्या. तो नेहमी आपल्या भावना उघडपणे व्यक्त करायचा. त्याला लवकर राग येतो. मात्र प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो.
गौतम गंभीर हा सध्या भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक आहे. भारतीय संघ गंभीरच्या प्रशिक्षणाखाली पहिली कसोटी मालिका बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. ही मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर दुसरा आणि शेवटचा सामना कानपूरमध्ये खेळला जाईल.
या मालिकेनंतर टीम इंडियाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. वर्षाच्या शेवटी भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईल.
हेही वाचा –
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी आनंदाची बातमी! दुखापतीनंतर टीम इंडियाचा ‘लॉर्ड’ पुनरागमनासाठी सज्ज
4,4,4,4,4….बाबर आझमनं नवख्या गोलंदाजावर काढला राग; तरीही संघाचा पराभव
भारतीय क्रिकेटचा पुढील सुपरस्टार कोण? ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केली निवड