यंदा 2021 मध्ये आयपीएलचा चौदावा हंगाम होणार आहे. त्यासाठी प्रत्येक संघाने आपली संघ बांधणी सुरू केले आहे. 20 जानेवारीला सर्व संघांनी आपल्या संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आणि आपल्या संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची जाहीर केली आहे. आयपीएलचा चौदावा हंगाम एप्रिल महिन्यात आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी खेळाडूंचा लिलाव 18 किंवा 19 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आता गौतम गंभीरने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली यांच्यात नेहमीच शीतयुद्ध सुरू असते. या दोघांमध्ये बर्याचदा वाद झालेले पाहायला मिळाले आहेत. कित्येकदा पाहिले गेले आहे की, गौतम गंभीरने विराट कोहलीवर निशाना साधलेला आहे. यावेळेस सुद्धा असे काहीसे घडले आहे.
यंदा आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने विराट कोहलीवर निशाना साधला आहे. गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला, “आठ वर्षापासून एकही किताब जिंकला नाही. हा खूप मोठा कालावधी आहे. मला सांगा असा कोणता कर्णधार आहे. कर्णधाराला सोडा. कोणत्या खेळाडूचे नाव सांगा, जो 8 वर्षात एक ही किताब न जिंकता खेळत आहे.
गौतम गंभीर म्हणाला, “मला कोहलीच्या विरुद्ध काही बोलायचे नाही. परंतु कोहलीने पुढे येऊन म्हणायला हवे की, मी यासाठी जबाबदार आहे.”
यंदाच्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी 20 जानेवारीला आपल्या संघातील कायम केलेले आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची होती. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने आपल्या संघातील १० खेळाडू मुक्त केले. यावरून गौतम गंभीरने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गौतम गंभीर म्हणाला, आरसीबी संघासाठी सर्वात मोठी समस्या आहे की, प्रत्येक वर्षी मोठे बदल करतात. यामुळे खेळाडूंच्या मनामध्ये असुरक्षित निर्माण होते.
गौतम गंभीर पुढे म्हणाला, “प्रश्न फक्त 10 खेळाडूंना मुक्त करण्याचा नाही. समजा तुम्ही त्यांना परतही घेतले. तर त्यांना एक खराब हंगाम गेला की त्यांना मुक्त केले जाते. वास्तवात ही प्रशिक्षकाची अडचण आहे.”
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने चौदाव्या हंगामाच्या लिलावापूर्वी आपल्या संघातील 10 खेळाडूंना मुक्त केले आहेत.
मुक्त केलेले खेळाडू – मोईन अली, शिवम दुबे, गुरकिरत सिंग मन, ऍरॉन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, इसरु उडाना, उमेश यादव, पार्थिव पटेल आणि डेल स्टेन.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला करा कसोटी संघाचा कर्णधार, इंग्लंडच्या दिग्गजाची मागणी
दिल्ली संघाने रिलीज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झळकावले ‘त्याने’ शानदार शतक
ट्रिपल एच म्हणतोय, ‘…तर मी असतो दुसरा सचिन तेंडुलकर’