भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक विराट कोहली (virat kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. विराटच्या या निर्णयानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. क्रिकेटविश्वातील अनेकांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर विराटला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) देखील यासंदर्भात व्यक्त झाला आहे. त्याच्या मते कर्णधारपद कोणाचा जन्मसिद्ध अधिकार नाहीये.
गंभीर स्टार स्पोर्ट्सचा कार्यक्रम गेम प्लानमध्ये बोलताना म्हणाला की, “कर्णधारपद कोणाचा जन्मसिद्ध अधिकार नाहीय. एमएस धोनीसारख्या खेळाडूने कर्णधारपदाची जबाबदारी विराटवर सोपवली होती. धोनीही विराटच्या नेतृत्वात खेळला होता, जो तीन आयसीसी आणि तीन-चार आयपीएल ट्रॉफी जिंकलेला. त्यामुळे मला वाटते की, विराट कोहलीने धावा करण्याकडे पाहिले पाहिजे, जे अधिक महत्वाचे आहे.”
“जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहता, तेव्हा तुम्ही कर्णधार बनण्याचे स्वप्न पाहत नाहीत. तुम्ही भारतासाठी सामना जिंकण्याचे स्वप्न पाहता. काहीच बदलत नाही शिवाय याच्या की, तुम्ही त्याठिकाणी नाणेफेक करण्यासाठी जाणार नाहीत आणि खेळाडूंना क्षेत्ररक्षणासाठी उभे देखील करणार नाही. पण, उर्जा आणि तीव्रता तीच राहिली पाहिजे, कारण देशासाठी खेळणे ही सन्मानाची गोष्ट आहे.” असे गंभीर पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, विराटच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने सात वर्षापेक्षा अधिक काळ कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळले. कसोटी कर्णधारपदाच्या काळात त्याने सर्वाधिक ४० कसोटी सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला. यादरम्यान भारतीय संघाने विदेशातील काही महत्वाच्या कसोटी मालिका देखील जिंकल्या आहेत.
भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव मिळाल्यानंतर विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले, तरी खेळाडूच्या रूपात तो संघात आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत विराट केएल राहुलच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत केएल राहुल एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल.
महत्वाच्या बातम्या –
Ashes Trophy| कांगारूंकडून साहेबांना शिकस्त! होबार्ट कसोटीसह ऍशेसवर ४-० ने कब्जा
श्रीलंका दौऱ्यात ‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणे, पुजाराची सुट्टी निश्चित! ‘हे’ तरुण शिलेदार घेऊ शकतात जागा
धोनीसोबतचा प्रसंग आणि इतरही आठवणींना उजाळा, अनुष्काकडून ‘कर्णधार’ विराटचे अभिनंदन; ‘My Love…’
व्हिडिओ पाहा –