---Advertisement---

‘इंग्लंडचे फलंदाज स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी…’ गतविजेत्यांची खराब फलंदाजी पाहून गंभीरची लक्षवेधी प्रतिक्रिया

Ben-Stokes
---Advertisement---

गतविजेत्या इंग्लंड संघासाठी विश्वचषक 2023 स्पर्धा खूपच निराशाजनक ठरताना दिसत आहे. इंग्लंड संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यातील दुसरा सामना सोडला, तर इंग्लंडने उर्वरित 3 सामन्यात पराभव पत्करला आहे. अशात त्यांचा पाचवा सामना गुरुवारी (दि. 26 ऑक्टोबर) बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात त्यांनी अत्यंत लाजीरवाणी फलंदाजी केली. संघाचा डाव दोनशेपेक्षा कमी धावसंख्येवर ढेपाळला. अशात इंग्लंडच्या फलंदाजांवर भारतीय माजी दिग्गज गौतम गंभीर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

इंग्लंडचा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला
या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, कुसल मेंडिस (Kusal Mendis) याच्या नेतृत्वातील श्रीलंकेच्या गोलंदाजांनी बटलरचा हा निर्णय प्राथमिकरीत्या सपशेल चुकीचा ठरवला. यावेळी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 33.2 षटकात दहाच्या दहा विकेट्स गमावत 156 धावा केल्या. इंग्लंडची ही निराशाजनक फलंदाजी पाहून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने मोठे विधान केले.

काय म्हणाला गंभीर?
फलंदाज नेहमीच आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यासाठी टिच्चून फलंदाजी करताना दिसतात. मात्र, गंभीरच्या मते, इंग्लंडचे हे खेळाडू संघापेक्षा जास्त स्वत:ची प्रतिष्ठा जपण्यासाठी खेळताना दिसले. गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना इंग्लंडच्या फलंदाजाबद्दल भाष्य करत म्हटले की, “इंग्लंड संघाचे फलंदाज इंग्लंडपेक्षा जास्त स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी खेळले.”

कशी राहिली इंग्लंडची फलंदाजी?
झाले असे की, इंग्लंडकडून डावाची सुरुवात करण्यासाठी जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान उतरले होते. मात्र, पॉवरप्लेमध्येच संघाचे दोन स्टार खेळाडू तंबूत परतले. त्यात डेविड मलान (28) आणि जो रूट (3) यांचा समावेश होता. त्यानंतर संघाच्या पुढील 3 विकेट्स 100 धावांच्या आत म्हणजेच 85 धावांवर पडल्या. त्यात जॉनी बेअरस्टो (30), जोस बटलर (8) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (1) यांचा समावेश होता.

संघासाठी सर्वोच्च खेळी बेन स्टोक्स (Ben Stokes) याने खेळली. त्याने 73 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. याव्यतिरिक्त मोईन अली (15) आणि डेविड विली (नाबाद 14) यांनीही दोन आकडी धावसंख्या केली. संघाचे सहा फलंदाज 1 आकडी धावसंख्येवर बाद झाले.

यावेळी श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना लाहिरू कुमारा चमकला. त्याने 7 षटके गोलंदाजी करताना 35 धावा खर्चून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त कसुन रजिथा आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, महीश थीक्षणा यानेही 1 विकेट आपल्या नावावर केली. (Gautam Gambhir said England batters played more for their reputation than for England read here)

हेही वाचा-
दिल्लीतील ‘या’ गोष्टीवर ऑसी खेळाडूंमध्ये दोन गट, मॅक्सवेल नाराज, तर वॉर्नर खुश; नेमकं प्रकरण काय?
भारतात नाही, तर ‘या’ देशात होणार IPL 2024चा लिलाव? तारखांबाबत मोठी अपडेट आली समोर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---