भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर व खासदार गौतम गंभीर हा नेहमी आपल्या रोखठोक विधानांसाठी ओळखला जातो. गंभीर सध्या समालोचक व समीक्षक अशा भूमिका देखील पार पाडत आहे. नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने भारतीय क्रिकेटमधील व्यक्ती पूजेबाबत मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे. त्याने थेट भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी व विराट कोहली यांना लक्ष केले.
गौतम गंभीर नुकताच एका वाहिनीवर भारतीय क्रिकेटविषयी बोलत होता. त्यावेळी त्याने भारतीय क्रिकेटमध्ये व्यक्तीपूजेची परंपरा असल्याचे म्हटले. गंभीर म्हणाला,
“एकाच खेळाडूसाठी भारतीय चाहत्यांचा वेडेपणा असणे चुकीचा आहे. विराट कोहली आणि एमएस धोनी यांना लोकांचे जितके प्रेम मिळते तितके इतर खेळाडूंना मिळत नाही. भारतीय क्रिकेटमधील हीच व्यक्ती पूजा धोकादायक आहे. तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये एकाला मोठे करू शकत नाही. सर्वात मोठे फक्त भारतीय क्रिकेट आहे. अशा खेळाडूंच्या सावलीत इतर खेळाडू मोठे होत नाहीत. आधी धोनी होता आता विराट आहे.”
त्याने याचे उदाहरण देताना म्हटले,
“नुकत्याच झालेल्या आशिया चषकात विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकले. सर्वजण त्याचे कौतुक करत होते. मात्र, त्याच सामन्यात अवघ्या चार षटकात पाच बळी घेणाऱ्या भुवनेश्वर कुमार याचे फारसे कौतुक झाले नाही. अशा प्रकारच्या संस्कृतीतून भारतीय क्रिकेट बाहेर पडायला हवे.”
गंभीर हा यापूर्वी देखील अनेक वेळा अशा प्रकारचे विधाने करत असतो. भारताने जिंकलेल्या दोन्ही विश्वचषकाचे श्रेय धोनीचे एकट्याचे नव्हते असे देखील तो म्हणालेला. भारताचे माजी प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात गंभीरला स्वकेंद्री म्हटले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कार्तिक इन, पंत आऊट! दिग्गजाने निवडलीये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया, वाचा ओपनर कोण ते
टीम इंडियाविरूद्ध ‘बिग शो’ मॅक्सवेलची स्पेशल तयारी; पाहा व्हिडिओ
भारतीय युवा बॉक्सिर्सनी सर्बियातील गोल्डन ग्लोव्ह ऑफ व्होजवोडिना स्पर्धेत जिंकली 19 पदके