भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने आज (१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावरुन त्याच्या निवृत्तीची माहिती दिली.
जुलै २०१९ मध्ये विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसला नव्हता. अशात अचानक आज आपल्या निवृत्तीची घोषणा करत धोनीने सर्वांना चकित केले आहे. सोशल मीडियावर सर्वत्र धोनीचीच चर्चा होत आहे. चाहत्यांपासून ते क्रिकेट जगतातील खेळाडूंपर्यंत सर्वजण धोनीच्या शानदार कारकिर्दीची आठवण काढत आहेत.
दरम्यान क्रिकेट जगतातील अनेक क्रिकेटपटूंनी धोनीच्या निवृत्तीबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरनेही ट्विटरद्वारे त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने धोनीच्या क्रिकेट प्रवासाचे वर्णन खूप अनोख्या पद्धतिने केले आहे आहे. Gautam Gambhir Tweet On Ms Dhoni Retirement
गंभीर म्हणाला की, “भारत अ पासून ते भारतीय संघापर्यंतचा आपला प्रवास हा प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम आणि उद्गारवाचक चिन्हांनी भरलेला आहे. पण, आता तू ज्याप्रकारे तुझ्या धड्यावर पूर्णविराम लावला आहेस. त्यावरुन मी तुला एवढे म्हणेन की, तुझ्या प्रवासाचा नवा टप्पा हा उत्साहदायी असेल, ज्यामध्ये डीआरएसच्या कोणत्याही मर्यादा नसतील! चांगला खेळलास.”
From “India A” to “The India” our journey has been full of question marks, commas, blanks & exclamations. Now as you put a full stop to your chapter, I can tell u from experience that the new phase is as exciting and there’s no limit to DRS here!!! Well played @msdhoni @BCCI
— Gautam Gambhir (@GautamGambhir) August 15, 2020
महत्त्वाच्या बातम्या –
मुख्यमंत्र्यांची बीसीसीआयकडे मागणी, धोनीची एक फेअरवेल मॅच घ्या!
विराट धोनीबद्दल म्हणतो, ‘जगाने तूझे यश पाहिले, मी तूझ्यातील व्यक्ती पाहिला’
ट्रेंडिंग लेख –
धोनीच्या अशा ५ सर्वोत्तम खेळी, ज्यामुळे भारताला मिळाले होते अविस्मरणीय विजय
‘कॅप्टनकूल’ धोनीने सावरली या ५ खेळाडूंची कारकिर्द, नाहीतर अवघड होते…
५ असे प्रसंग जेव्हा एमएस धोनी आपल्या खेळाडूंच्या बचावासाठी आला पुढे…