fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आफ्रिदीला कोरोनाची लागण होताच गौतम गंभीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Gautam Gambhir wished Shahid Afridi a speedy recovery from novel coronavirus

मुंबई । संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार माजला असून हा खतरनाक विषाणू लोकांची पाठ सोडायला तयार नाही. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती स्वतः शाहिद आफ्रिदीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. आफ्रिदीला कोरोनाची लागण होताच भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी कळताच गौतम गंभीरने तो लवकरच बरा व्हावा, असे म्हटले आहे.

2011 चा विश्वचषक भारताला मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचललेल्या गौतम गंभीरने सलाम क्रिकेट 2020 या मंचावर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, ” या व्हायरसची लागण कोणालाही होऊ नये. आफ्रिदीचे माझ्याबरोबर राजकीय मतभेद जरुर आहेत पण मी प्रार्थना करेन की तो लवकरच बरा व्हावा.”

पाकिस्तानचा 40 वर्षीय अष्टपैलू खेळाडू आफ्रिदीने कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ट्विट केले होते की,  “मला गुरुवारपासून अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर माझी टेस्ट करण्यात आली आणि दुर्दैवाने मी पॉझिटिव्ह निघालो. यातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे.” आफ्रिदीच्या या ट्विटनंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू आणि क्रिकेट फॅन्स यांनीही तो लवकरच बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली.

गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक सुरू असते. राजकारण आणि क्रिकेटच्या मुद्यांवर ते नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यातील मतभेद आहेत हे जगजाहीर आहेत.

आफ्रिदी मागील काही दिवसांमध्ये त्याच्या वादग्रस्त विधानांमुळेही अनेकदा चर्चेत आला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्याने टीका केली होती. त्यावेळी संपूर्ण देशभरात आफ्रिदीच्या विरोधात संतापाची लाट उसळली. हरभजन सिंग आणि युवीने देखील आपला राग ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला. गौतम गंभीरनेही आफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतला होता.

दोन पाकिस्तानी क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण

शाहिद आफ्रिदी पूर्वी दोन पाकिस्तानी क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली होती. सलामीचा माजी फलंदाज तौफिक उमर याला देखील या विषाणूने घेरले होते. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटर जफर सरफराज यांना देखील याची लागण झाली होती. तसेच माजिद हक (स्कॉटलंड) आणि सोलो एन्क्वेनी (दक्षिण अफ्रीका) हे क्रिकेटपटू देखील कोरोना बाधित झाले होते.

आफ्रिदीने केले अन्नदान

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानी लोकांना मदत करण्यासाठी शाहिद आफ्रिदी धावून आला होता. काही दिवसांपूर्वी तो पाकिस्तानमधल्या काही भागात जाऊन हजारो लोकांना अन्नदान करत असताना दिसून आला होता. त्यावेळी अनेकांनी त्याचे कौतुकही केले होते.

ट्रेंडिंग घडामोडी – 

मूळचे राजस्थानचे असलेले सोलंकी ‘या’ संघाला देणार क्रिकेटचे धडे

रागाच्या भरात चाहत्याला मारण्यासाठी नेले ड्रेसिंग रुमपर्यंत ओढत, पहा त्या खेळाडूचा व्हिडिओ

या माजी कर्णधाराचे रिसॉर्ट आहे खूप हटके, एक रात्र राहण्याचे घेतो तब्बल ८८ हजार रुपये!

You might also like