---Advertisement---

‘या’ कारणामुळे एंडरसन आणि ब्रॉड भारताविरुद्ध प्रभावी ठरणार नाहीत, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी गावसकरांची भविष्यवाणी

On: सोमवार, जून 28, 2021 6:06 PM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पराभव झाल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीला लागला आहे. भारताला आता संघामध्ये थोडेफार बदल करावे लागतील. भारतीय संघाने केलेल्या चुकांचे उत्तर आता शोधले पाहिजे आणि त्यावर अभ्यास करण्याची गरज आहे. दरम्यान, भारतीय संघाचे लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे.

येत्या ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्येच थांबला आहे. थोड्या दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ नॉटिंगहॅमला रवाना होईल. माजी भारतीय फलंदाज गावसकर सांगतत की, या कसोटी मालिकेत भारतीय संघाला काळजी करण्याची गरज नाही आहे.

एका वर्तमानपत्राशी बोलतांना त्यांनी सांगितले की, “भारतीय फलंदाजांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची चिंता करण्याची काही गरज नाही आहे. कारण, तोपर्यंत चांगलेच उन पडणार आणि खेळपट्टी सुकलेली असणार. जर,जेम्स एंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडला पहिल्या सत्रात विकेट मिळाली नाही तर, दुसऱ्या सत्रात त्यांना संघर्ष करावा लागेल.”

गेल्या वेळेस जेव्हा भारतीय संघ येथे आला होता तेव्हा भारतीय संघ ४-१च्या फरकाने पराभूत झाला होता. भारतीय संघाने २००७ नंतर तीन वेळा (२०११,२०१४,२०१८) इंग्लंडचा दौरा केला होता. परंतु, एकदाही भारतीय संघाला तिथे मालिका जिंकता आली नाही. पण भारतीय खेळाडूंना निराशा होता कामा नये. त्यांनी या परिस्थीतीचा चांगला सामना केला पाहिजे, असे यावेळी गावसकर यांनी सांगितले.

सुनील गावसकर सांगतात, “भारतीय संघाची इंग्लंडमध्ये मोसमाची सुरुवात निशाजनक झाली आहे. परंतु, भारतीय संघाने निराश न होता आत्मविश्वासाने सामना करावा. आत्मविश्वास असल्यास नशीब बदलून जाते आणि भारतीय संघाला अशाच प्रकारे काहीतरी करावे लागेल, तरच त्यांना पुनरागमन करणे शक्य होईल.”

महत्त्वाच्या बातम्या:

म्हणून समालोचन करण्याचा घेतला निर्णय, दिनेश कार्तिकने खास पोस्टसह केला खुलासा

टेनिस चाहत्यांना मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूची टोकियो ऑलम्पिकमधून माघार

सचिन तेंडूलकरनेही केले मान्य, WTC फायनलमध्ये टीम इंडियाची ‘या’ बाबतीत झाली चूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---