मागच्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवणारे कुस्तीपटू आंदोरन करत आहेत. यात विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या मोठ्या नावांचा समावेश आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात हे कुस्तीपटू एकत्र आले आहेत. अशातच वर्ल्ड चॅम्पियन गीता फोगाट आणि तिच्या पतीला पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोवारी समोर आली.
विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिची चुलत बहीण गीता फोगाट (Geeta Phogat) गुरुवारी आंदोलन सुरू असलेल्या जंतर-मंतरवर पोहोचण्यासाठी याठिकाणी आली होती. पण पोलिसांनी याठिकाणी येणाऱ्यांना आतमध्ये प्रवेश बंद केला होता. अशात गीता फोगाट हिला देखील याठिकाणी प्रवेश करता आला नाही. 2010 साली भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या गीता फोगाटने आपल्या ट्वीटर खात्यावर पोलिसांकडून अटक झाल्याची माहिती दिली. ती आपला पती पवन सरोहा याच्यासोबत जंतर-मंतरवर आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटूंना भेटण्यासाठी आली होती.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गीता फोगाटसह दोन तीन इतर लोकांनाही जाहांगीरपूरजवल ताब्यात घेतले गेले. सध्या त्यांना सोडवण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये गीता सर्व पोलिस अधिकाऱ्यांच्या मधे उभी आहे. ती या सर्वांकडे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंशी भेटण्याची परवानगी मागत आहे. दरम्यान, या कुस्तीपटूंनी बुधवारी रात्री इतर कुस्तीपटू आणि समर्थकांना जंतर-मंतरवर एकत्र येण्याचे आवाहन केले होते. बुधवारीच रात्री 11च्या दरम्यान पोलिसांना आंदोरनकर्त्यांना मारहान केल्याचे आरोपही होत आहेत.
मुझे और मेरे पति पवन सरोहा को दिल्ली पुलिस ने गिरफ़्तार कर लिया है।
बहुत दुःखद— geeta phogat (@geeta_phogat) May 4, 2023
कुस्तीपटूंच्या आंदोलनाचे कारण काय?
बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक (Sakshi Malik), विनेश फोगाट यांच्यासह अनेक कुस्तीपटू कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. कुस्तीपटूंनी असा आरोप केला आहे की, बृजभूषण आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असून आतापर्यंत अनेक महिला खेळाडूंवर लैंगिक शोषण केले आहे. कुस्ती महासंघाचे अध्यपद बृजभूषण सिंग यांनी सोडावे आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू असेल, अशी माहिती या कुस्तीपटूंकडून मिळत आहे. (Geeta Phogat and her husband arrested by police for meeting protesting wrestlers in Delhi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! मार्करमने टिपला ‘कॅच ऑफ द सिझन’, व्हिडिओ पाहून व्हाल अवाक्
BIG BREAKING: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेतीचा घरात आढळला मृतदेह, 32 व्या वर्षी सोडले जग