भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने (Team india’s captain Shubman gill) इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अविश्वसनीय फलंदाजी केली आहे. गिलने पहिल्या 4 डावांमध्ये दोन शतकं झळकवत एक द्विशतकही ठोकलं आहे. बर्मिंघम कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक पूर्ण करताच शुबमन गिलने अनेक मोठे विक्रम त्याच्या नावावर केले.
यासोबतच कर्णधार गिलने मालिकेला सुरूवात होण्याआधी जे वचन दिलं होतं, ते त्याने फक्त दोन कसोटी सामन्यांमध्येच पूर्ण केलं आहे.
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी शुबमन गिलने पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, या दौऱ्यावर तो संघाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून खेळेल. पहिल्या 4 डावांमध्ये गिलने अगदी त्याच अंदाजात फलंदाजी करत हे सिद्ध केलं. त्यामुळे कर्णधार गिलने त्याचं वचन पूर्ण केलं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
शुबमन गिल (Shubman gill) अशा प्रकारे दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे, ज्याने एका कसोटी सामन्यात शतक आणि द्विशतक दोन्ही झळकावलं आहे. कर्णधार गिलने पहिल्या डावात 269 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात तो 130 धावांवर नाबाद खेळत आहे.