प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात रविवारी (८ सप्टेंबर) बंगाल वारीयर्स विरुद्ध पुणेरी पलटण संघात ८१ वा सामना पार पडला. या सामन्यात बंगालने ४२-३९ अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात पुण्याच्या संघाला पराभवाचा धक्का बसला असला तरी त्यांचा कबड्डीपटू पंकज मोहितेने चांगली कामगिरी करत पहिला सुपरटेन पूर्ण केला. त्याचबरोबर या सामन्यात ३ टॅकल पॉइंट्स मिळवणाऱ्या गिरिश एर्नाकनेही खास पराक्रम केला आहे. गिरिशने प्रो कबड्डीमध्ये २५० टॅकल पॉइंट्स पूर्ण केले आहेत.
त्याचे आता प्रो कबड्डीमध्ये ९९ सामन्यात २५० टॅकल पॉइंट्स झाले आहेत. गिरिश प्रो कबड्डीमध्ये २५० किंवा त्यापेक्षा अधिक टॅकल पॉइंट्सचा टप्पा पार करणारा एकूण सहावा तर महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडु ठरला आहे.
प्रो कबड्डीत सर्वाधिक टॅकल पॉइंट्स मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंमध्ये गिरिश पाठोपाठ विशाल माने आहे. विशालने ११९ सामन्यात १८८ टॅकल पॉइंट्स मिळवले आहेत
प्रो कबड्डीत सर्वाधिक टॅकल पॉइंट्स मनजीत छिल्लरच्या नावावर आहेत. मनजीतने १०५ सामन्यात ३३७ टॅकल पॉइंट्स मिळवले आहेत.
प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक टॅकल पॉइंट्स मिळवणारे कबड्डीपटू –
३३७ – मनजीत छिल्लर (१०५ सामने)
३०१ – रविंद्र पहेल (१०३ सामने)
२९२ – संदीप नरवाल (११६ सामने)
२८५ – फजल अत्रचली (९४ सामने)
२७२ – मोहित छिल्लर (१०५ सामने)
२५० – गिरिश एर्नाक (९९ सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘एक हजारी मनसबदार’ परदीप नरवालने प्रो कबड्डीत रचला मोठा इतिहास
–जो रुटने हा मोठा पराक्रम करत मिळवले कूक, तेंडूलकर सारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान
–विंडीज विरुद्ध हॅट्रिक घेत या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूने रचला इतिहास