टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (११ नोव्हेंबर) पार पडलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. विजयानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ अंतिम सामन्यात रविवारी (१४ नोव्हेंबर) एकमेकांसमोर असतील. दरम्यान, पाकिस्तानने या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या केली, पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी शेवटच्या काही षटकात पाकिस्तानी गोलंदाजांची खूपच आक्रमक खेळ केला आणि विजय मिळवला.
पाकिस्तानचा वेगावान गोलंदाज हॅरिस रऊफनेही काही खास गोलंदाजी केली नाही. मात्र, सामन्यानंतर तो चर्चाचा विषय ठरत आहे. रऊफ आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल या दोघांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.
रऊफने या सामन्यात ३ षटके टाकली आणि ३२ धावा दिल्या. त्याला या षटकांमध्ये एकही विकेट घेता आला नाही. असे असले तरी, यापूर्वी त्याने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या सामन्यात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले होते आणि सामनावीर ठरला होता. तसेच त्याने टी-२० विश्वचषकातील ६ सामन्यात ७.३० च्या इकोनॉमीने ८ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, उपांत्य सामन्यात त्याला चांगले प्रदर्शन करता आले नाही.
उपांत्य सामन्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि हॅरिस रऊफने त्यांची जर्सी एकमेकांसोबत अदला बदली केली आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना या दोघांमधील खेळाडूवृत्ती खूपच आवडली आहे.
मॅक्सवेल आणि रऊफ यांच्यात या फोटोत दिसणाऱ्या मैत्रीचे एक खास कारण आहे. रऊफ ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीममध्ये मॅक्सवेलच्या नेतृत्वातील मेलबर्न स्टार्स या संघासाठी खेळला आहे आणि दोघांमध्ये त्यामुळेच चांगली मैत्री आहे, जी या फोटोमधून दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोत दोघांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे.
Stars family 💚 #TeamGreen pic.twitter.com/0WKyYRiLdz
— Melbourne Stars (@StarsBBL) November 11, 2021
रऊफने मागच्या वर्षा खेळल्या गेलेल्या बिग बॅश लीगमध्ये पदार्पण केले होते. त्याने यावेळी सिडनी थंडर या संघाविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. मागच्या वर्षी त्याने या स्पर्धेत १० सामन्यांमध्ये २० विकेट्स घेतल्या होत्या.
त्यावेळी मॅक्सवेलने रऊफचे कौतुक केले होते. त्यावेळी मॅक्सवेल म्हणाला होता की, रऊफ काय करू शकतो, याला सीमा नाहीत. तो सुपरस्टार आहे. भाषेच्या मर्यादांमुळे आम्ही त्याला व्यवस्थित ओळखू शकलो नाहीत. पण क्रिकेटच्या मैदानावर त्याचे प्रदर्शन अविश्वसनीय राहिले आहे. त्यावेळी रऊफनेही मॅक्सवेलचे आभार मानले होते आणि तो म्हणाला होता की, मॅक्सवेलला माझ्या गोलंदाजी करण्याच्या क्षमतेवर विश्वास होता आणि त्याने माझा सर्वात जास्त उपयोग करून घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय महिला कुस्तीपटूच्या मृत्यूची पसरली होती अफवा, दुसऱ्या दिवशी तिनेच जिंकले सुवर्ण पदक