ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांची मालिका गुरुवारी ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखत जिंकली. या विजयात ग्लेन मॅक्सवेलच्या ९० चेंडूत १०८ धावा व ऍलेक्स कॅरेच्या ११४ चेंडूत १०६ धावा या सामन्यातील विशेष ठरल्या. यात ऍलेक्स कॅरे सहाव्या तर ग्लेन मॅक्सेवल सातव्या स्थानावर फलंदाजीला आला होता.
या सामन्यात ३१ वर्षीय ग्लेन मॅक्सवेलने एक खास पराक्रम केला. त्याने वनडे कारकिर्दीत ३ हजार धावांचा टप्पा पार केला. ११३ वनडे सामन्यांत १०३ डावांत फलंदाजी करताना त्याने ३३.२९च्या सरासरीने ३०६३ धावा केल्या. परंतू यातील एक विशेष बाब म्हणजे त्याने या धावा १२३.०६च्या सरासरीने केल्या. केवळ २४८९ चेंडूंचा सामना करताना वनडे कारकिर्दीत त्याने ३०६३ धावा केल्या आहेत.
वनडे कारकिर्दीत ३ हजार धावा करण्यासाठी सर्वात कमी चेंडू खेळणारा तो जगातील पहिला फलंदाज बनला आहे. यापुर्वी जॉस बटलरने २५३३ चेंडूत ३ हजार धावांचा टप्पा पार केला होता.
वनडेत कमीत कमी ३ हजार धावा केलेल्या फलंदाजांमध्ये मॅक्सवेलने सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. यापुर्वी हा विक्रम जॉस बटलरच्या नावावर होता. त्याने ११९.०५च्या सरासरी धावा केल्या आहेत. तर शाहिद आफ्रिदीने ११७, जेसन रॉयने १०६.७, सेहवागने १०४.३, जॉनी बेअस्ट्रोने १०३.७ व एबी डिवीलिर्सने १०१.१च्या सरासरीने ३ हजार किंवा अधिक वनडे धावा केल्या आहेत.