अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चांगलाच रोमांचक ठरला. पण ऑस्ट्रेलियन संघ सामन्यात खूप मागे पडला, असे वाटत असतानाच ग्लेन मॅक्सवेल याने संघाचा डाव सावरला. संघाच्या पहिल्या सात विकेट्स स्वस्तात पडल्या होत्या. पण त्यानंतर मॅक्सवेल अडचणीच्या काळात ऑस्ट्रेलियासाठी हिरो ठरला आणि आपले शतक पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या या सामन्यात 7 विकेट्सच्या नुकसानावर 91 धावा होती. पहिल्या सात विकेट्स स्वस्तात मिळवल्यानंतर अफगाणिस्तान संघाचे पारडे सामन्यात जट वाटत होते. पण ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने एकट्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीमध्ये पोहोचवले. अवघ्या 76 चेंडूत त्याने 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 100 धावांचा टप्पा पूर्ण केला. 33 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 7 विकेट्सच्या नुकसानावर 190 धावांपर्यंत मॅक्सवेलमुळेच पोहोचली.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 50 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर अफगाणिस्तानने 291 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचे लक्ष्य मिळाले. (Glenn Maxwell scored an amazing century when the team was in trouble)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, ऍडम झम्पा.
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फोडून काढण्यासाठी सचिनने केली मदत, शतकी खेळीनंतर इब्राहिमने मानेल मास्टर ब्लास्टरचे आभार
वातावरण टाईट! अफगाणी गोलंदाजांनी स्वस्तात तंबूत धाडली आख्खी ऑस्ट्रेलियन बॅटिंग ऑर्डर