पुणे, 17 ऑगस्ट 2023: महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना यांच्या वतीने आयोजित आयटीएफ स्प्रिंट राष्ट्रीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत मिश्र सांघिक रिले मध्ये महाराष्ट्र संघाने अव्वल क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे सुरू असलेली ही स्पर्धा मिश्र सांघिक रिले प्रकारात पोहणे(250मीटर), सायकलिंग(6.2किलोमीटर) आणि धावणे(2.4किलोमीटर) मध्ये पार पडली. स्पर्धेत कौशिक मालंदकर, संजना जोशी, पार्थ मिरगे, मानसी मोहिते यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने 1:48:10 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदाचा मान पटकावला. तर, तामिळनाडू संघाने 1:50:10 सेकंद वेळ नोंदवत दुसरा क्रमांक आणि गुजरात संघाने 1:50: 21सेकंद वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला पदके व आकर्षक पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष दयानंद कुमार, मानद सचिव राजेंद्रन निंबालटे, तांत्रिक अधिकारी प्रभात शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंडियन ट्रायथलॉन फेडरेशनचे सदस्य यज्ञेश्र्वर बागराव आदी मान्यवर उपस्थित होते. अतिशय तंत्रशुद्ध आणि गुंतागुंतीच्या बाईक कोर्समुळे खेळाडूंची कसोटी लागली. या कोर्समध्ये असलेली ९ अवघड वळणे आणि ३ यू टर्न यामुळे संपूर्ण शर्यतभर प्रेक्षकांना निकालाबाबत अंदाज करता आले नाहीत.
इंडियन ट्रायथलॉन फेडरेशनचे डेव्हलपमेंट अधिकारी हरीश प्रसाद यांनी सांगितले की, ट्रायथलॉन मध्ये समावेश केलेला मिश्र रीले हा रोमांचक प्रकार आहे. या स्पर्धेत देशभरातील सर्वोत्तम खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करताना पाहणे आनंददायक होते. युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेले 4 खेळाडू आणि आगामी आशियाई-2023 क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारे 6खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. (Gold Medal for Maharashtra Team in Mini Orange ITF Mixed Relay National Triathlon Championship 2023)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: (प्रथम, द्वितीय व तृतीय यानुसार): मिश्र सांघिक रिले गट:
1. महाराष्ट्र (कौशिक मालंदकर, संजना जोशी, पार्थ मिरगे, मानसी मोहिते, 1:48:10 सेकंद),
2. तामिळनाडू (आकाश पेरुमलसामी, किर्थी सक्तवेल, वामन सक्तवेल, आरती एस, 1:50:10 सेकंद),
3. गुजरात(निताई रांदेरिया, हेनी झलावादीया, क्रिशिव पटेल, प्रग्या मोहन, 1:50: 21सेकंद)
महत्वाच्या बातम्या –
राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेत अभिजीत गुप्ता, अभिमन्यू पुराणिक, सेतुरामन एसपी, सुर्य शेखर गांगुली यांची विजयी सलामी
राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेत अभिजीत गुप्ता, अभिमन्यू पुराणिक, सेतुरामन एसपी, सुर्य शेखर गांगुली यांची विजयी सलामी