fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पीवायसी बुद्धिबळ लीग २०१९ स्पर्धेत गोल्डन किंग व ७ नाईट्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी बुद्धिबळ लीग स्पर्धेत गोल्डन किंग, 7नाईट्स या संघांनी आपापल्या गटात अव्वल स्थान कायम राखत अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत निखिल चितळे, तन्मय चितळे, शुभांकर मेनन आणि सारंग उर्धवर्षे यांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर 7नाईट्स संघाने किंग्ज 64 संघाचा 4-2 असा पराभव केला. 7नाईट्स संघाने राउंड रॉबिन फेरीत 4 विजय, 1 पराभवासह 23.5 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, गोल्डन किंग व वाडेश्वर विझार्डस यांच्यातील सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. गोल्डन किंग संघाने 3 विजय व 1 बरोबरीसह 20.5 गुण पटकावत अंतिम फेरीत धडक मारली.

अन्य लढतीत द बिशप्स चेक संघाने गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स संघाचा 4-2 असा पराभव करून विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: राउंड रॉबिन फेरी:

गोल्डन किंग बरोबरी वि.वाडेश्वर विझार्डस 3-3

(हेमंत उर्धवर्षे वि.वि.आशिष राठी 1-0; प्रियदर्शन डुंबरे पराभूत वि. अक्षय साठ्ये 0-1; अजिंक्य जोशी वि.वि.अमोल मेहेंदळे 1-0; निरंजन गोडबोले वि.वि.रोनित जोशी 1-0; अर्णव कुंटे पराभूत वि.कौस्तुभ वाळिंबे 0-1; अभिषेक देशपांडे पराभूत वि.कुणाल भुरट 0-1);

किंग्ज 64 पराभूत 7 नाईट्स 2-4

(राजन जोशी पराभूत वि. निखिल चितळे 0-1; जय केळकर पराभूत वि.तन्मय चितळे 0-1; आदित्य लाखे वि.वि.आदित्य भट 1-0; अद्वैत जोशी पराभूत वि.शुभांकर मेनन 0-1; रोहीन लागू पराभूत वि. सारंग उर्धवर्षे 0-1; राघव बर्वे वि.वि.विजय देशपांडे 1-0);

गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स पराभूत वि.द बिशप्स चेक 2-4

(अमेय कुलकर्णी पराभूत वि.अश्विन त्रिमल 0-1; अमोद प्रधान पराभूत वि. चारू साठे 0-1; राजशेखर करमरकर पराभूत वि. अभिषेक गोडबोले 0-1; ईशान लागू पराभूत वि. किरण खरे 0-1; विजय ओगळे वि.वि.असिम देवगांवकर 1-0; पराग चोपडा वि.वि.केतन रावल 1-0).

You might also like