भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या एनसीएसमध्ये आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट झाला असून वनडे सामन्यात 10 षटके टाकण्यासाठी तयार आहे. मागच्या मोठ्या काळापासून चाहते त्याला खेळताना पाहू शकले नाहीत. पण त्याने नुकताच एक कसोटी सामना खेळला आणि यात 10 षटका गोलंदाजी केली.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मागच्या काही महिन्यांपासून रिहॅब करत आहे. याठिकाणी त्याने सरावाला देखील सुरुवात केली होती. अशातच आता त्याने मुंबई संघासोबत एक सराव सामना खेळल्याचेही सांगितले जात आहे. शुक्रवारी (28 जुलै) हा सामना खेळला गेला असून बुमराहने यात 10 षटके टाकली आणि एक विकेट घेतली. बेंगलोरच्या बाहेर अलूर क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेल्याचे सांगितले जात आहे. सलामीवीर अंगकृष रघुवंशी याला त्याने बाद केले. अंगकृष रघुवंशीने 8 चेंडू खेळून एकही धाव न करता विकेट गमावली.
सराव सामन्यात बुमराहची फिटनेस पाहून तो आगामी आयर्लंड दौऱ्यासाठी भारताचे प्रतनिधित्व करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कुठलीच अधिकृत माहिती समोर आली नाहीये. आयर्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघाला आशिया चषक आणि आयसीसी वनडे विश्वचषक खेळायचा आहे. या दोन प्रमुख स्पर्धांसाठीही बुमराहची फिटनेस भारतीय संघासाठी महत्वाची ठरणार आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बुमराह पूर्णपणे फिट आहे आणि आयर्लंड दौऱ्यासाठी संघासोबत जाऊ शकतो.
दरम्यान, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा देखील लवकरच संघात पुनरागमन करू शकतो. त्याने देखील शनिवारी (29 जुलै) भारताविरुद्धच्या सामन्यात 10 षटके गोलंदाजी केली. प्रसिद्ध देखील पाठीच्या दुखापतीनंतर संघात पुनरागमन करत आहे. त्याने सराव सामन्यात 10 षटके गोलंदाजी केली आणि 2 विकेट्स घेतल्या. बीसीसीआयच्या माहितीनुसार बुमराह आणि प्रसिद्ध दोघेही अजून काही सराव सामन्यांमध्ये खेळतील. (Good news for fans! Jasprit Bumrah regained fitness, bowled 10 overs in practice match)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! मुंबई इंडियन्सने जिंकली नववी ट्रॉफी! फायनलमध्ये कर्णधार पूरनची 137* रन्सची वादळी खेळी
नाबाद 137 धावा करून एमआयला जिंकवणाऱ्या पूरनची रिएक्शन व्हायरल, पाहा एमएलसी 2023ची विनिंग मुव्हमेंट