लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएलच्या १४ व्या हंगामातील आपल्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ६ विकेट्सने पराभूत करत सलग तिसरा विजय मिळवला आहे. सामन्यानंतर लखनऊचा कर्णधार केएल राहुल याने संघाच्या गोलंदाजांचे कौतुक केले असून याबरोबर कोणत्या गोष्टीत सुधारणा करावी लागेल, हेही सांगितले आहे.
केएल राहुल म्हणाला, पॉवर प्लेमधील धावा थांबवण्यावर मेहनत घ्यावी लागेल. दिल्लीने पॉवर प्लेमध्ये एकही गडी न गमावता ५२ धावा केल्या होत्या. राहुल (KL Rahul) म्हणाला, “गोलंदाजीत आम्ही शानदार कामगिरी केली परंतु पॉवर प्लेमध्ये जाणाऱ्या अतिरिक्त धावांवर काम करावे लागेल. पॉवर प्लेनंतर गोलंदाजांनी संवाद साधून योग्य लाइन आणि लेंथची माहिती घेतली आणि त्यानुसार योग्य पद्धतीने आंमलबजावणी केली.”
तो म्हणाला, “आम्हाला माहीत होते की, आम्हाला किती लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. दवाचा प्रभाव सर्वच संघांच्या डोक्यात बसला आहे आणि त्यामुळे नाणेफेक जिंकले की, सर्व संघ सुरुवातीला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत आहेत.”
दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) दवामुळे गोलंदाजी करणे कठिण असल्याचे म्हटले आहे. पंत म्हणाला, ‘निश्चितपणे जेव्हा अशा प्रकारचे दव पडते, तेव्हा तुम्ही काहीच तक्रार करु शकत नाही. फलंदाजी युनिटच्या रुपात आम्ही १०-१५ धावा कमीच केल्या. आम्हाला ४० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत १०० टक्के योगदान द्यायचे होते.’
तो म्हणाला, ‘आम्ही पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा केल्या. परंतु, मधल्या षटकांमध्ये समीकरण बदलले. फिरकी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. परंतु, आम्ही १०-१५ धावा कमी केल्या.
लखनऊ संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी शाॅच्या शानदार अर्धशतकाच्या आणि रिषभ पंतच्या ३९ तर सरफराज खानच्या ३६ धावांच्या खेळीच्या मदतीने दिल्लीने लखनऊसमोर १५० धावांचे लक्ष्य ठेवले. लखनऊकडून क्विंटन डी काॅकने ८०, तर केएल राहूलने २४ धावा केल्या. डी काॅकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आयुष बदोनीने विजयी षटकार लगावला. त्यामुळे लखनऊने हा सामना १९.४ षटकातच ६ विकेट्सने जिंकला. दिल्लीचा या हंगामातील सलग दुसरा पराभव आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
PL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल पंजाब वि. गुजरात सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
कहर योगायोग! जन्मदिनाच्या तारखेएवढ्याच धावा कारकिर्दीत करणारा एकमेव खेळाडू
दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडले लखनऊचे फलंदाज; ४ विकेट्स गमावत खेळ केला खल्लास