दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथला २ वर्षांच्या कार्यकाळासाठी डायरेक्टर ऑफ क्रिकेट दक्षिण आफ्रिका म्हणून निवडण्यात आले आहे. स्मिथने शुक्रवारी (१७ एप्रिल) दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉकबद्दल मोठे भाष्य केले आहे.
स्मिथ (Graeme Smith) म्हणाला की, डी कॉक (Quinton De Kock) आता कसोटी संघाचे नेतृत्व करणार नाही. तो सध्या दक्षिण आफ्रिका (South Africa) वनडे आणि टी२० संघाचा कर्णधार आहे. यापूर्वी फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) २ महिन्यांपूर्वीच दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद सोडले होते.
स्मिथ आता क्रिकेटच्या सर्वात मोठ्या प्रकारासाठी नव्या कर्णधाराचा निर्णय करेल.
डी कॉकबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला की, “डी कॉक दक्षिण आफ्रिका टी२० आणि वनडे संघाचा कर्णधार असेल. परंतु कसोटी संघाच्या कर्णधाराची (Captain) जबाबदारी सध्या त्याला देणार नाही. आम्हाला असे वाटते की, तो चांगल्या प्रकारे खेळत रहावे. मी सांगू शकत नाही की, पुढील कर्णधार कोण असेल. आम्ही त्यावर चर्चा करू. कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सांभाळणारा सध्या असा कोणताही खेळाडू नाही.”
स्मिथ पुढे म्हणाला की, क्रिकेट दक्षिण आफ्रिका जोखिम घेणार्या खेळाडूंना जबाबदारी देण्यास तयार आहे. जसे की, टेंबा बावुमा आणि आयडन मार्करम किंवा डीन एल्गारसारख्या दिग्गज खेळाडूंना ही जबाबदारी दिली जाऊ शकते.
दक्षिण आफ्रिका संघाने मागील वर्षी झालेल्या विश्वचषकात खराब कामगिरी केली होती. यानंतर त्यांनी बदल केले. तसेच अनेक दिग्गज खेळाडूंचा संघात समावेश केला होता. मार्क बाऊचरला त्यावेळी संघाचा प्रशिक्षक बनविले होते. तर स्मिथला डायरेक्टर ऑफ क्रिकेट म्हणून निवडण्यात आले होते. तसेच स्मिथचा करार पुढील २ वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेने नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या देशांतर्गत वनडे मालिकेत पराभूत केले होते.
सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-हा खेळाडू म्हणतो, धोनीसारखा कॅप्टन होणे नाही
-क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा ‘पंचगिरी’ करताना दिसणार नाही हे दोन महान अंपायर