इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे.या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात पूर्णपणे भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. तर दुसरीकडे इंग्लंड संघातील खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. ज्यामुळे या खेळाडूंवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. अशातच इंग्लंड संघाच्या माजी क्रिकेटपटूने देखील इंग्लंड संघातील फलंदाजांवर जोरदार टीका केली आहे.
भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडच्या मुख्य फळीतील फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. परिणामी पहिला सामना अनिर्णीत राहिला होता तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाला १५१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यामुळे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम गुच यांनी मुख्य फळीतील फलंदाजांवर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी असे देखील म्हटले आहे की, “ॲलिस्टर कूक अजूनही वर्तमान संघासाठी डावाची सुरुवात करू शकतो.” ॲलिस्टर कूकने ३ वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तसेच इंग्लंड संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
ग्रॅहम गुच यांनी डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “ॲलिस्टर कूकने तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तरीदेखील तो वर्तमान संघासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी योग्य पर्याय आहे. त्या क्रिकेटपटूंपैकी प्रत्येकजण कठोर मेहनत घेत आहे, स्वत:ला तयार करत आहे. प्रयत्नांची कमी नाही, पण वृत्ती, तांत्रिक क्षमता, ज्ञान आणि एकाग्रता अशा गोष्टींचा खेळांत समावेश असतो. विशेषत: सलामीवीरांसाठी, कारण एक चूक आणि तूमच्यासाठी तो दिवस संपतो”
तसेच ते पुढे म्हणाले की, “मी केवळ इतकं सांगू शकतो की, क्रिकेटमध्ये वाईट काळ देखील येतो. हा एक सांघिक खेळ असला तरी देखील वैयक्तिक कामगिरी ही तितकीच महत्वाची आहे. साधे सोपे म्हणजे, आपल्याकडे एक योजना असते, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे मजबूत मन असणे गरजेचे असते. जर तुमच्या मनात शंका निर्माण होत असेल, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.” (Graham Gooch slams englands top order for woeful show says alaister cook still good enough to open for them)
इंग्लंड संघाकडून कर्णधार जो रूट हा एकमेव फलंदाज आहे. जो सतत चांगली कामगिरी करत आहे. त्याने या मालिकेतील दोन सामन्यांत ३८६ धावा केल्या आहेत. तर रॉरी बर्न्सने ६७ आणि डॉम सिब्लेने ५७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्या’ कृत्यासाठी अनेक वर्षानंतर मार्क बाऊचरला मागावी लागली माफी
इंग्लंडच्या सलामीवीराला झालंय तरी काय? ‘या’ नको असलेल्या विक्रमात केली जसप्रीत बुमराहची बरोबरी