आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (11 मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना खेळला जाईल. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होत असलेल्या या सामन्याला लक्षणीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही संघांसाठी या सामन्यात विजय गरजेचा असेल. त्याचवेळी या सामन्याआधी इंग्लंडचा माजी फिरकीपटू व सध्या समालोचक म्हणून कार्यरत असलेल्या ग्रॅम स्वानने राजस्थान रॉयल्सविषयी मोठे वक्तव्य केले आहे.
हंगामाची धमाकेदार सुरुवात करणाऱ्या राजस्थानच्या कामगिरीत कमालीची दुर्दशा दिसून आली. पहिल्या पाच पैकी 4 सामन्यात त्यांनी विजय मिळवला होता. मात्र, मागील सहापैकी 5 सामन्यात त्यांनी पराभव स्वीकारला आहे. सध्या संघाचे 11 सामन्यांमध्ये 10 गुण असून, केवळ सरस धावगतीच्या जोरावर राजस्थान पाचव्या क्रमांकावर काबीज आहे. एक वेळ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेल्या या संघाची कामगिरी पाहून स्वान म्हणाला,
“राजस्थानने हंगामाची सुरुवात ज्या प्रकारे केली आणि आता त्यांची जी स्थिती आहे हे पाहून मी हैराण झालो. राजस्थान प्ले ऑफपासून दोन विजय दूर वाटतो. मागील दोन सामने त्यांनी सहज जिंकायला हवे होते. मात्र, ते कदाचित पराभूत होण्यासाठीच कारणे शोधत आहेत.”
तो पुढे बोलताना म्हणाला,
“जोस बटलर फॉर्ममध्ये येणे मला शुभ संकेत वाटतो. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे संदीप शर्माने नो बॉल टाकून सामना घालवला नाही पाहिजे.”
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात संदीप शर्मा ने अखेरचा चेंडूवर नो बॉल टाकल्याने राजस्थानला पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे आता उर्वरित तिन्ही सामने जिंकून त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करावा लागेल.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ऍडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
(Greame Swann Take Dig On Rajasthan Royals Poor Performance In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शिवम दुबे बनलाय नवी ‘सिक्स हिटिंग मशिन’! आयपीएल 2023 मधील आकडेवारी ‘एकदम झकास’
वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सने रचला इतिहास! एकाच दिवशी तीन मेडल केले पक्के