मागच्या काही वर्षांपासून चर्चेत असलीली महिला प्रीमियर लीग अखेर शनिवारी (4 मार्च) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स संघात खेलला गेला. मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत जबरदस्त प्रदर्शन करून मोठा विजय मिळवळा. गुजरात जायंट्स संघाचा या सामन्यात झालेला पराभव पाहून अनेकांना आयपीएलच्या पहिल्या हंगामातील पहिला सामना आठवला.
डब्ल्यूपीएलच्या या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स संघ शनिवारी आमने सामने आले. उभय संघांतील हा सामना मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना हरमनप्रीत कौर () हिच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने 5 बाद 207 धावा केल्या. प्रत्युत्तरात बेथ मुनी () हिच्या नेतृत्वातील गुजरात जायंट्स संघ मात्र स्वस्तात सर्वबाद झाला. गुजरात संघाला सामन्यातील 20 षटकेही खेळून काढता आली नाहीत. 15.1 षटकात अवघ्या 64 धावा करून गुजरातने एकूण 9 विकेट्स गमावल्या. कर्णधार बेथ मुनी रिटायर्ड हर्ट झाल्याने मुंबईला 10वी विकेट घ्यावी लागली नाही.
बीसीसीआयने पुरुषांची आयपीएल 2008 साली सुरु केली. पहिल्या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात विराट प्रतिनिधित्व करत असलेला आरसीबी संघ 140 धावांच्या अंतराने पराभूत झाला होता. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 3 बाद 222 धावा कुटल्या होत्या. प्रत्युत्तारत आरसीही 82 धावा करून सर्वबाद झाला. या सामन्यात आरसीबीची अवस्था ज्या पद्धतीची झाली होती, अगदी तशीच अवस्था शनिवारी रात्री गुजरात जायंट्स (महिला) संघाची झाली. विशेष म्हणजे लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी आणि गुजरात हे दोन्ही संघ 15.1 षटकात सर्वबाद झाले.
दरम्यान, शनिवारी मुंबईत पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार हरमनप्रीत कौर मॅच विनरची भूमिका पार पाडू शकली. हरमनप्रीतने अवघ्या 30 चेंडूत 65 धावा कुटल्या. हरमनच्या बॅटमधून सलग सात चौकारही निघाले. तिने या धावा एकूण 14 चौकारांच्या मदतीने केल्या. गोलंदाजी विभागातून सायका इशाक () हिने सर्वाधिक 4 विकेट्स घेत मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. (Great start to WPL! Know why fans remember the first IPL match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्याच सामन्यात मुंबईची कर्णधार हरमनप्रीतने रचला इतिहास! ठरली पहिलीच महिला खेळाडू
पहिली ओव्हर, पहिली विकेट, पहिली धाव अन् पहिला षटकार, वाचा WPLमधील खेळाडूंची पहिली-वहिली कामगिरी