भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये लवकरच ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका संपल्यानंतर ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत ओमीक्रॉनची भीती वाढत चालली आहे. ज्याचा भारतीय संघातील खेळाडूंना देखील धोका आहे. अशातच क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने खेळाडूंच्या सुरक्षितेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे वैद्यकीय अधिकारी शुएब मांजरा यांनी म्हटले की, “जर भारतीय संघातील कुठल्याही खेळाडूला किंवा संघ व्यवस्थापकातील सदस्याला कोरोनाची लागण झाली तर, त्यांच्यासाठी रुग्णालयात बेडची सुविधा करण्यात आली आहे. तसेच कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्या खेळाडूची कोरोना चाचणी केली जाईल. ती चाचणी निगेटीव्ह आल्यास, खेळाडूला विलागिकरणात राहावे लागणार नाही.”
हे वाचा – काय सांगता? विश्वविक्रमवीर एजाजची न्यूझीलंड संघातून गच्छंती; प्रशिक्षक म्हणतायेत…
तसेच मांजरा पुढे म्हणाले की, “आम्ही नियमितरित्या अधिकारी आणि दक्षिण आफ्रिकेत असलेल्या संघ व्यवस्थापकांच्या संपर्कात आहोत. संघातील खेळाडू निवांत राहताय. आता घोषणा देखील करण्यात आली आहे की, या मालिकेत प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाहीये. ज्यामुळे भीती आणखी कमी झाली आहे. आम्ही ही मालिका यशस्वीरित्या पार पाडण्याच्या प्रयत्नात आहोत.”
भारतीय संघातील खेळाडूंसाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने एक मोठा रिसॉर्ट बुक केला आहे. ज्यामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. इतकेच नव्हे तर बाहेरचं खाद्यपदार्थ देखील आत येऊ दिले जात नाही. तसेच रिसॉर्टमध्ये असलेल्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची सतत कोरोना चाचणी केली जात आहे. कसोटी आणि वनडे मालिकेदरम्यान खेळाडूंना मैदानात येऊन सामना पाहण्याची अनुमती दिली गेली नाहीये. तरीदेखील भारतीय खेळाडूंना वाटल्यास, ते मालिका सोडून आपल्या मायदेशी जाऊ शकतात. ज्याची परवानगी त्यांना क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
भारत, पाकिस्तानसह ‘असे’ आहेत अंडर-१९ विश्वचषकासाठीचे सर्व संघ, वाचा एका क्लिकवर
हा व्हिडिओ पाहा :