---Advertisement---

RCB vs GT : जिंकण्यासाठी गुजरात टायटन्स समोर 170 धावांचे आव्हान

---Advertisement---

आयपीएल 2025 मधील 14वा आज (2 एप्रिल) खेळला जात आहे. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स आमने सामने आहेत. हा सामना बंगळुरुच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच चिन्नास्वामी येथे खेळवला जात आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने प्रथम फलंदाजी करताना 169 धावांचा टप्पा गाठला. आता गुजरात टायटन्स संघाला जिंकण्यासाठी 170 धावांचे आव्हान दिले आहे.

बंगळुरू साठी प्रथम फलंदाजी करताना संघासाठी सर्वाधिक धावा लियाम लिंग्विस्टन (54) आणि जे शर्मा (33) यांनी केल्या. त्याचबरोबर, टीम डेव्हिड याने नाबाद राहून 12 चेंडूत 16 धावा केल्या. परंतु, कर्णधार पाटीदार केवळ 12 धावा करू शकला. विराट कोहली निव्वळ सहा चेंडूत 7 धावा करून बाद झाला.सलग दोन विजयानंतर आज आरसीबी संघ फलंदाजी करताना डगमगलेला दिसून आला.

गुजरात साठी सर्वोत्तम गोलंदाजी मोहम्मद सिराज ने केली त्याने चार षटकात फक्त 19 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. तसेच साई किशोरने दोन विकेट्स घेतल्या. बाकीच्या गोलंदाजांनी एक एक विकेट्स घेतली. आता गुजरात किती शतकात हे आव्हान पूर्ण करेल हे पाहणं रंजकतेच असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---