इंडियन प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना सोमवारी (29 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरातच्या सर्व फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत 4 बाद 214 धावा केल्या. गुजरातच्या या धावसंख्येत सर्वात मोठे योगदान युवा फलंदाज साई सुदर्शन याने दिले. त्याने 96 धावा केल्या. यासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले.
या हंगामात ज्यावेळी संधी मिळाली आहे त्यावेळी सुदर्शन याने उत्कृष्ट खेळ दाखवला. अंतिम सामन्यात फॉर्ममध्ये असलेला शुबमन गिल बाद झाल्यानंतर त्याला मोठी खेळी करण्याची संधी होती. त्याने ही संधी साधली. चेन्नईच्या सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याने 47 चेंडूवर 8 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 96 धावा केल्या.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात नर्व्हस 90 मध्ये बाद होणार आहे तो तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी मुरली विजय 2011 आयपीएल अंतिम सामन्यात 95 धावांवर बाद झालेला. तर, मनिष पांडेने 2014 मध्ये 94 धावा केल्या होत्या.
यासोबतच साई सुदर्शन हा आयपीएलच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारा दुसरा सर्वात युवा फलंदाज ठरला. हा विक्रम मनन वोहराच्या नावे असून, त्याने 20 वर्ष व 318 दिवसांच्या वयात ही कामगिरी केली होती. साई सुदर्शन याचे वय आज रोजी 21 वर्ष 226 दिवस आहे.
(Gujarat Titans Sai Sudarshan Hits 96 Runs Innings In IPL 2023 Final Against Chennai Super Kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित
फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा