क्रिकेटमध्ये सध्या एका नवीन प्रकारच्या चेंडूची चर्चा आहे. नेपाळच्या एका वेगवान गोलंदाजाने त्याचा आविष्कार केला आहे. ओमान, नेपाळ आणि अमेरिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी नेपाळच्या संघाने एका नवीन वेगवान गोलंदाजाला संघात सामील केले आहे. या गोलंदाजाचे नाव आहे ‘गुलशन झा’. या गोलंदाजाने आतापर्यंत केवळ २ देशांतर्गत सामने खेळले आहेत. असे असले तरीही त्याने निवडकर्त्यांना प्रभावित केले आहे आणि राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे. या ३ संघात खेळवली जाणारी ही तिरंगी मालिका १४ सप्टेंबरपासून ते २० सप्टेंबर या कालावधीत ओमानमध्ये आयोजित केली आहे.
गुलशन झाने त्याच्या पहिल्याच सामन्यात सर्वांना केले प्रभावित
नेपाळ पोलीस क्लब आणि आर्म्ड पोलिस फोर्स क्लब यांच्यात खेळल्या गेलेल्या देशांतर्गत सामन्यात गुलशन झा नेपाळ पोलीस क्लबसाठी खेळला होता. सामन्यादरम्यान आर्म्ड पोलीस फोर्स क्लबच्या फलंदाजांना त्याच्या चेंडूचा वेग लक्षात आला नाही. सामन्यामध्ये विरोधी संघातील खेळाडू एकापाठोपाठ एक विकेट गमावत गेले. गुलशनने सामन्यात ७ षटके गोलंदाजी केली, त्यात त्याने ३६ धावा देत ४ विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीच्या मदतीने संघने ८ विकेटने सामना जिंकला.
सामन्यादरम्यान गुलशन झाने एक असा चेंडू टाकला, ज्याची सर्वत्र चर्चा झाली. क्रिकेटमध्ये अनेकदा खेळाडूचा एक डाव, एक चेंडू किंवा त्याच्या चांगल्या प्रदर्शनातील एक क्षण त्या खेळाडूच्या कारकीर्दीला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. गुलशनबाबतही असेल झाले. त्याच्या आगळ्यावेगळ्या बाऊन्सरला ‘परफ्यूम बॉल’ असे नाव मिळाले आणि हीच त्याची नवी ओळख बनली आहे.
काय आहे परफ्यूम बाॅल?
गुलशन झाने खेळलेल्या दुसऱ्या देशांतर्गत सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत तो खडक बोहोराला एक खतरनाक बाऊंसर टाकताना दिसत आहे. काठमांडू मेयर्स ११ आणि नेपाळ पोलीस क्लब यांच्यात हा सामना खेळला गेला. व्हिडिओत दिसते की, सामन्यादरम्यान गुलशनचा एक चेंडू वेगात फलंदाजाच्या हेल्मेटच्या जवळून गेला आहे. फलंदाजाने कसाबसा तो चेंडू हुकवला. व्हिडिओत हा चेंडू ज्याप्रकारे टाकला गेला आहे, हे पाहून असे लक्षात येते की हा चेंडू खेळणे अशक्यच होते. चेंडू नाकाच्या अगदी जवळून गेल्यामुळे या चेंडूला ‘परफ्यूम बाॅल’ नाव दिले गेले आहे. या सामन्यादरम्यान गुलशनच्या गोलंदाजीमध्ये असा चेंडू अनेकदा पहायला मिळाला.
Gulshan Jha
New Recruit of Team Nepal for #CWCL2 & the series with PNG.@sourabhsanyal @Bibhu237@vmanjunath @Arnavv43 @arunbudhathoki @TheBiddhut @Fancricket12 #KTMMayorsCup pic.twitter.com/xdQj7sfuuW— Sagar poudel (@MalaiBalBho) August 21, 2021
तिरंगी मालिकेआधी पापुआ न्यू गिनीसोबत भिडणार नेपाळचा संघ
नेपाळच्या संघाचा कर्णधार ज्ञानेंद्र मल्ला आणि उपकर्णधार दीपेंद्र सिंग एयरी आहेत. ओमानमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिरंगी मालिकेआधी नेपाळच्या संघाला पापुआ न्यू गिनीविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. तिरंगी मालिकेसाठी नेपाळने त्यांचा संघ घोषित केला आहे.
नेपाळची प्लेइंग इलेव्हन : ज्ञानेंद्र मल्ला (कर्णधार), दीपेंद्र सिंग एयरी, कुशल भुर्तल, आसिफ शेख, गुलशन झा, आरिफ शेख, कुशल मल्ला, बिनोद भंडारी, करन केसी, सोमपाल कमी, संदीप लमिच्छाने, पवन सर्राफ, अविनाश बोहरा, रोहित पाउडेल, सुशन भारी, शरद वेस्वकर, विक्रम सोब
महत्त्वाच्या बातम्या-
एका बाऊन्सरने नेपाळच्या ‘या’ गोलंदाजाला आणलं प्रकाशझोतात, थेट राष्ट्रीय संघात झाली निवड
पाकिस्तानी फलंदाजाचे विंडीजविरुद्ध झंझावती शतक; गावसकर, गांगुलीसारख्या दिग्गजांवर ठरला वरचढ