fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एक नाही, दोन नाही; तब्बल ५१ वर्ष आहे अबाधित या भारतीयाचा कसोटी विक्रम

Gundappa Vishwanath Only Indian Cricketer To Score Both Duck And Hundred On Test Debut

भारतीय क्रिकेटच्या इतिहासाची पाने उलगडून पाहिली तर, आपल्याला अनेक दिग्गज भारतीय फलंदाजांची नावे सापडतील. मात्र, भारतीय संघात असेही एक फलंदाज होते ज्यांना मनगटाचा जादूगर म्हटले जायचे. विशेष म्हणजे, ते फलंदाज सुनील गावसकर यांचे मेहुणे आहेत. ते महान फलंदाज अजून कोण नसून गुंडप्पा विश्वनाथ हे आहेत.

विश्वनाथ यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. मात्र त्यांचा एक असा विक्रम आहे, जो गेल्या ५१ वर्षांपासून अबाधित आहे.Gundappa Vishwanath Only Indian Cricketer To Score Both Duck And Hundred On Test Debut

विश्वनाथ यांनी १५ नोव्हेंबर १९६९ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केल होते. कानपुर येथे झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी विश्वनाथ हे सामन्यातील पहिल्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज ऍनल कोनोली यांना विश्वनाथ यांना शून्य धावेवर बाद केले होते.

तर दुसऱ्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विश्वनाथ यांनी १३७ धावांची खेळी केली होती. यात त्यांच्या २५ चौकारांचा समावेश होता. यासह विश्वनाथ हे कसोटी पदार्पणाच्या सामन्यातच पहिलाय डावात शून्य धावा आणि दुसऱ्या डावात शतक करणारे पहिले भारतीय फलंदाज ठरले. त्यांचा हा विक्रम अजुनही अबाधित आहे.

विश्वनाथ यांनी त्यांच्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत ९१ सामने खेळत ६०८० धावा केल्या आहेत. यात त्यांच्या १४ शतकांचा आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

तब्बल ६५ शतके ठोकणाऱ्या ‘या’ खेळाडूंच्या यशा पाठीमागेच रहस्य आहे…

‘एकेवळी फक्त सचिन एकटाच खेळायचा’ पहा या वाक्यात किती आहे तथ्य?

‘या’ दोन खेळाडूंचे करियर संपल्यात जमा होते, धोनी पॅटर्नने केली कमाल

You might also like